शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : औक्षण, बाबासाठी लेकाचा हट्ट अन्…; भारत-पाक तणावात भारतीय सैनिक पुन्हा कामावर जाताच कुटुंबिय भावुक, मुलगा रडायला लागला तेव्हा…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2025 | 10:49 am
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
soldiers viral video

Video : औक्षण, बाबासाठी लेकाचा हट्ट अन्...; भारत-पाक तणावात भारतीय सैनिक पुन्हा कामावर जाताच कुटुंबिय भावुक, मुलगा रडायला लागला तेव्हा...

Viral Video : सध्या देशभरात भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीचा माहोल असताना आपण आपल्या घरात कुटुंबासह सुखाची झोप घेत आहोत त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय सैनिक. प्रत्येक जवान जीवाचे रान करुन भारताच्या सीमेवर लढा देत आहे. या जवानांच्या कुटुंबियांना मात्र झोप लागत नसावी. आपला माणूस सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून शत्रूपासून आपले रक्षण करतोय हा विचार सतत मनात येत असावा. हो. आणि याचा अभिमान जरी असला तरी काळजीपोटी जीव हा तुटतोच. आताचा गरम माहोल पाहता काही दिवसांपूर्वी सुट्ट्यांसाठी घरी परतलेल्या या फौजींना कामावर रुजू होण्याचे आदेश आले.

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आणि तात्काळ सर्वांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. अशातच सोशल मीडियावर एका जवानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुट्टी रद्द होताच हा जवान कसलाही विचार न करता कामावर परतण्यास सज्ज झाला आहे. किती काही असलं तरी मनावर दगड ठेवून या जवानाला त्याच्या बायको-मुलापासून, आईपासून दूर जावं लागणार असल्याचं दुःख चेहऱ्यावर उमटू न देता देशसेवेचा आनंद ओसंडून वाहताना दिसला.

आणखी वाचा – “देशात काय चाललंय भान ठेवा”, नारकर कपलच्या डान्सवर नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या म्हणाल्या, “तुम्ही भारतीय ना…”

View this post on Instagram

A post shared by Prasad Dargude (@_prasad_dargude7788_)

प्रकाश दर्गुडे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल झालेला हा व्हिडीओ, “भारत पाकिस्तान सीमेवर माहोल गरम असताना फौजीच्या सुट्ट्या रद्द करुन परत बोलावून घेतले”, असं कॅप्शन देत शेअर केला आहे. दोन व्हिडीओ त्यांनी यावेळी पोस्ट केले आहेत. यांत एका व्हिडीओमध्ये, तो फौजी बॅग पॅक करुन सोफ्यावर बसला आहे आणि त्याची आई त्याचे औक्षण करताना दिसत आहे. आपल्या जीवापलीकडे असणाऱ्या तिच्या या लेकराला देशाचे रक्षण करायला जाताना ती सकारात्मक ऊर्जा देताना दिसली.

आणखी वाचा – “मुली स्वतःच उड्या मारत आहेत”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं कास्टिंग काऊचचं धक्कादायक सत्य, म्हणाली, “दोन-तीन चित्रपटांसाठी…”

तर दुसरा व्हिडीओ, काळजाला चीर पाडणारा होता. एकीकडे आई मुलाला काळजावर दगड ठेवून सीमेवर लढायला पाठवत होती तर दुसरीकडे त्याच्या फौजीचा चिमुकला मुलगा (रुद्रांक्ष) हा वडिलांना कुठेही जाऊ नका, इथेच राहा, अशी विनवणी करताना दिसला. “पप्पा तुम्ही जाऊ नका ना”, असं म्हणत तो वडिलांना विनवणी करत आहे. तर “जावं लागेल बेटा”, असं म्हणत तो फौजी लेकाची समजूत काढताना दिसत आहे. सध्या या फौजीचा मनाला चटका लावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे.

Tags: soldiers emotional videosoldiers family emotionalviral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Aishwarya Narkar Slams Trollers

"म्हातारचळ लागलंय" म्हणणारीचं अकाऊंट ऐश्वर्या नारकरांनी शोधून काढलं, स्वतः हाफ पॅन्ट-टीशर्टमध्ये अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.