‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येत असतानाच मालिकेत आलेल्या एका रंजक वळणाने मालिकेची उत्सुकता वाढवून ठेवली असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर कंपनीच्या एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी आदित्य, पारू, दिशा, गणि आणि प्रीतम सगळेजण निघालेले असतात. पण ज्या ठिकाणी ते थांबलेले असतात तिथे प्रीतमने बुकिंग केलेली नसते आणि त्या हॉटेलमध्ये एकही रूम उपलब्ध नसते. हॉटेलचा मॅनेजर त्यांना गोठ्याकडची एक जागा देतो आणि सांगतो की, तुम्ही आजची रात्र इथे काढू शकता. इथे कुठेही हॉटेल नाही आणि पुढे जाणंही तुम्हाला धोक्याचे ठरेल. (Paaru Serial Update)
त्यानंतर पारू गणीच्या मदतीने ती जागा साफ करून घेते आणि गवताची गादी करून त्यावर चादर अंथरून सर्वांना झोपायला सांगते. पारूने बनवलेलं अंथरून पाहून प्रीतम व आदित्य खूपच खुश होतात. तर इकडे गणि सांगतो की, माझ्या पोटात कावळे ओरडू लागलेत. मला खूप भूक लागली आहे. त्या वेळेला पारू जाऊन हॉटेलच्या मॅनेजरला विचारते की, काही जेवायला आहे का?, त्यावर हॉटेलचा मॅनेजर सांगतो की, आता शेफ सुद्धा घरी गेलेला आहे आणि आम्ही रोजचा रोज सामान आणतो त्यामुळे हॉटेलमध्ये तसं काही नाही. जे काही उरलं असेल ते मी तुम्हाला आणून देतो तुम्ही बनवून खाऊ शकता. त्यानंतर इकडे पारु चुलीवरच जेवण बनवते ते पाहून आदित्य तिचं खूपच कौतुक करतो.
पारूने सर्वांसाठी भाकरी व भरलं वांग बनवलेलं असतं. जेवायला ताटं नसतात म्हणून ती पानांमध्ये त्यांना जेवण वाढते. तरी एकीकडे दिशा गाडीत झोपलेली असते तेव्हा पारू तिला बोलवायला जाते मात्र कोणीतरी गाडीला नॉक करते असं समजून दिशा घाबरते आणि पारूला बघून ती तिला ओरडू लागते की सारखं सारखं नॉक करून पळून का जात आहेस. मी घाबरले ना यावर दिशा एकटी राहायला घाबरते म्हणून ती पारूबरोबर जाते आणि जेवायला बसते. त्यानंतर पारूच्या हातचे वांग आणि भाकरी खाऊन सगळेजण खूप खुश होतात आणि पारूचं भरभरून कौतुक करताना दिसतात. त्यानंतर सगळेजण झोपी जातात. सकाळी उठून सगळेजण त्या हॉटेल मॅनेजरचे आभार मानतात आणि पुन्हा गाडीने प्रवासाला निघतात. प्रवासादरम्यानच गाडी पुढे जात असताना त्यांच्या गाडीच्या काचेवर कोणीतरी अंड फेकून मारतात तेव्हा प्रीतम गाडी थांबवतो आणि म्हणतो की आता हे साफ करायला हवं. गाडीतून खाली कोण उतरणार यावरून सगळ्यांची भांडण होतात मात्र प्रीतम म्हणतो की, कोणी उतरू नका मी उतरतो. त्यानंतर प्रीतम खाली उतरतो आणि गाडीची काच साफ करतो तितक्यात पाठीमागून प्रीतमच्या डोक्यात कोणीतरी जोरात दगड मारत आणि प्रीतम खाली कोसळतो. यावर आदित्य व पारू बाहेर जाऊन प्रीतमला सांभाळत असतात. ते प्रीतमला गाडीत आणून बसवतात.
त्यानंतर पारू गाडीत बसायला जाणार इतक्यातच काही गुंड पारुला पकडतात आणि तिच्या मानेवर सुरी धरतात. आदित्यला पारू आवाज देते तेव्हा आदित्यलाही काही गुंड पकडतात. तर इकडे दिशा आणि गणी, प्रीतम गाडीतच बसलेले असतात.आता नेमकं ते गुंड कोणाच्या जीवाला हानी पोहोचवणार नाहीत ना?, पारू व आदित्य ही परिस्थिती कशी सांभाळतील हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.