शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जंगल सफारी, बोटिंगही केली अन्…; मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा वाढदिवस ‘या’ ठिकाणी केला साजरा, नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 12, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate

जंगल सफारी, बोटिंगही केली अन्…; मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा वाढदिवस 'या' ठिकाणी केला साजरा, नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी घराघरात पोहोचली. दोघांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात प्रथमेश व मुग्धाच्या गाण्याचे चाहते असलेले पाहायला मिळतात. ‘आमचं ठरलं’ म्हणत दोघांनी प्रेमाची कबुली देत काही दिवसांनी लग्न सोहळा उरकला. लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाह सोहळा झालेला पाहायला मिळाला. लग्नानंतर ही जोडी बरेच चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate)

सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही चाहत्यांसह शेअर करत त्यांना अपडेट देत असतात. अशातच मुग्धाने आता शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मुग्धाला प्रथमेशने खास सरप्राईज दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नानंतरच्या वाढदिवसाला प्रथमेशने दिलेले हे खास सरप्राईज मुग्धाने शेअर केलं आहे. “लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला”, असं कॅप्शन देत मुग्धाने प्रथमेशने दिलेल्या सरप्राइजचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Mother’s Day निमित्ताने अर्जुन व अमोलने अप्पीसाठी बनवलं स्पेशल ग्रिटींग, अर्जुनचं प्रेम अप्पीपर्यंत पोहोचणार का?

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

मुग्धा व प्रथमेश सध्या कर्नाटक येथे फिरायला गेले आहेत आणि तेथे फिरतानाचा हा एक छोटासा व्हिडीओ तिने शेअर केलेला पाहायला मिळत आहे. या वेळेला ते कर्नाटक येथील जंगल सफारीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच ते बोटिंगचाही आनंद घेताना दिसत आहेत. पहिल्यांदाच बोटिंग केलं असल्याचे यावेळी मुग्धाने म्हटलं. तसेच पहिल्यांदाच ती जंगल सफारी करणार असल्याचाही आनंद तिने यावेळी व्यक्त केला. शिवाय तेथील काही ऍक्टिव्हिटीजही ते करताना दिसतात. लग्नानंतरच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशने मुग्धाला दिलेलं हे खास सरप्राइज तिला आवडलं असून तिने व्हिडीओमध्ये प्रथमेशचे आभारही मानले आहेत.

आणखी वाचा – संजनाने अरुंधतीला काढलं घराबाहेर?, दोघींमध्ये वाद, अनिरुद्ध नेमकी कोणाची घेणार बाजू?, मालिकेत रंजक वळण

लग्नानंतर प्रथमेश व मुग्धा दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. आणि ते आनंदात असल्याचेही पाहायला मिळाले. प्रथमेश व मुग्धा हे बरेचदा कोकणदौरा करत असतात. प्रथमेश हा मूळचा कोकणातील असल्याने ते गावी जात असतात. तर मुग्धा ही अलिबागची असल्याने ते अलिबाग, कोकण असा प्रवास करत असतात.

Tags: entertainmentmarathi singermugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan birthday surprise
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Mrunal Dusanis Lovestory

पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती मृणाल दुसानिसची लव्हस्टोरी, पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, "लग्नाआधी फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.