‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर पारूने हरीशला गाठलेलं असतं. हरीश समोर ती आदित्यने गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राबद्दल सगळं काही खरं सांगते. ती सांगते की, मी हे लग्न तुमच्याबरोबर होणार म्हणून करायला तयार झाले होते पण त्या क्षणाला तुम्ही तिथे नव्हता आणि हे माझ्या गळ्यात आदित्य सरांनी मंगळसूत्र बांधलं इतकंच नव्हे तर मी हे मंगळसूत्र काढण्याचा बरेचदा प्रयत्न केला पण मी जेव्हा जेव्हा हे मंगळसूत्र काढलं तेव्हा तेव्हा आदित्य सरांवर संकट यायला लागली म्हणून मला आता माझ्या आयुष्यात आदित्य सरचं माझे पती असल्याचं वाटते. इतकंच नव्हे तर हे माझ्या मनात सुद्धा आहे त्यामुळे मला तुमची आयुष्यभर फसवणूक करायची नाही आहे. मनाविरुद्ध जाऊन मला काहीच करायचं नाही आहे. यावर हरीश पारुला विचारतो की, पारू हे सगळं आदित्य सरांना माहित आहे का?, यावर पारू नाही असे सांगते. तेव्हा हरीश विचारतो, मग आता पुढे काय?, तेव्हा पारू असे सांगते की, पुढे काय हे मला सुद्धा माहित नाही. पण मी तुम्हाला एक वचन देते की, तुमच्यावर अहिल्यादेवी व आदित्य सरांचा खूप विश्वास आहे तो विश्वास मी मोडू देणार नाही. तुम्ही काहीच काळजी करु नका मी हे घर सोडून निघून जायला तयार आहे. (Paaru Serial Update)
फक्त तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही माझ्या बाची काळजी घ्याल, कुठे जाणार आहे याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. जिथे वाट मिळेल तिथे मी जायला तयार आहे. तेव्हा बराच वेळ हरीश आला नाही म्हणून दिशा हरीशला बघायला येते. तेव्हा हरीश दिशाला सांगतो की, मी पाच मिनिटात येत आहे, दिशा खाली जाते तर इकडे दामिनी पारुला घ्यायला आलेली असते. तर सावित्री दार अडवून उभी असते त्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर दामिनी स्वतः घरात जाऊन पाहते तर पारू नसते. तेव्हा ती येऊन अहिल्यादेवींना सांगते की, पारू तर घरात नाही आहे. ती कुठेतरी पळून गेली आहे हे ऐकल्यावर अहिल्यादेवी दामिनीवर रागावतात मात्र दामिनी सांगते की, या वेळेला पारूची चूक आहे. पारू घरात नाही आहे. मी सगळीकडे तिला शोधलं. त्यानंतर आदित्य व प्रीतम पारूला शोधायला बंगल्याबाहेर येतात तर आदित्यला पारू तिथं गेट जवळ उभी असलेली दिसते. पारू घरात जाते तेव्हा आदित्य पारुला घेऊन घरात येतो त्यानंतर अहिल्यादेवी पारूवर खूप रागावतात आणि सांगतात की, आता हा बालिशपणा बंद कर.
तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तू अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. यावर आदित्य सांगतो की त्या वैजू बरोबर ती खेळत होती हे ऐकल्यावर त्या अजूनच रागावतात आणि गांभीर्याने वागायचं सांगतात. त्यानंतर दिशा तू अजून हळदीची ज्वेलरी घातली नाहीस म्हणून तिला विचारते. तेव्हा दामिनी सांगते की, मी स्वतः तिला तयार करते असं म्हणत दामिनी तयार करायला जाते तर पारूच्या हाताला आधीच हळद लागलेली असते. तेव्हा दामिनी बोलते की, तुला ही हळद कोणी लावली. आम्ही तर तुला हळद लावली सुद्धा नाही, त्याच्या आधीच तू हळद लावून घेतलीस?, यावर आदित्य सांगतो की, मी तिच्या हाताला पकडून आणलं तर माझ्या हाताची तिला हळद लागली. हे ऐकल्यावर सगळेजण शांत होतात तर त्यानंतर दिशा हरीशला बोलवायला जाते तेव्हा हरीश बेडरूममध्ये नसतो. तेव्हा दिशा म्हणते लग्नाच्या आदल्या रात्रीच नवरा पळून गेला, दिशा खाली येऊन अहिल्यादेवींना सांगते की हरीश त्याच्या खोलीत नाही आहे.
आणखी वाचा – मेहनत केल्यास यश हमखास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक आहे, जाणून घ्या…
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य पारुला विचारतो पारू तुझ व हरीशचं असं काय बोलणं झालं की तो थेट हळदीच्या रात्रीच निघून गेला. तुला त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना?, ते काय होतं तू आमच्यापासून काही लपवत आहेस का?, आता हे सगळं सत्य आदित्यसमोर येणार का?, मालिकेत पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरणार आहे.