‘पारू’ या मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींनी दत्तक घेतलेलं गाव हे माजी मंत्री सूर्यकांत कदमला हवं असतं, त्यात त्याचे २००करोड अडकलेले असतात. त्यामुळे तो अहिल्यादेवींचा नवरा श्रीकांतला किडनॅप करतो आणि अहिल्यादेवीजवळ मागणी करतो की, तुला जर श्रीकांत हवा असेल तर गावकऱ्यांच्या सह्या असलेला कागद तू माझ्याकडे आणून सोपव. अहिल्यादेवींना धमकी मिळाल्यानंतर अहिल्यादेवी खचून जातात पण त्या तसं दाखवत नाहीत तर इकडे दिशा व दामिनी बोलत असतात तेव्हा दोघी एकमेकांना या प्रकरणाबद्दल सांगत असतात आणि हसत असतात. (Paaru serial Update)
तर इकडे पारू आदित्य जवळ येते आणि विचारते की, देवी आई कशा आहेत?, यावर आदित्य सांगतो कि, आई अजूनही खंबीर आहे आणि ती योग्य तो निर्णय घेईल. तरीसुद्धा पारू सांगते की, बाई कितीही खंबीर असली तरी तिच्या पाठीमागची सावली हलली की ती कोलमडून जाते. तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांना विश्वास द्या की, तुम्ही श्रीकांत सरांना पुन्हा परत घेऊन याल. पारूचं म्हणणं आदित्यला पटतं आणि तो देवी आईजवळ जातो तेव्हा देवी आई एकांतात पाहत असतात. आदित्य देवी आईला विश्वास देतो की, मी बाबांना काहीच होऊ देणार नाही आणि ते परत येतील. यावर अहिल्यादेवी म्हणते हो तो परत येणारच आहे. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, असं म्हणून त्या रडू लागतात. तेव्हा आदित्यदेवी आईला आधार देतो.अहिल्यादेवी सांगते की, आज मी आदित्य प्रेम व कर्तव्य या कात्रीत पहिल्यांदा अडकले आहे. त्यामुळे मला निर्णय घेणे कठीण होत आहे. पण मी याचा निर्णय घ्यायचा असेल तर मी कर्तव्य निवडेन. हे ऐकल्यावर आदित्यला आपल्या आईचा अभिमान वाटतो.
तर दुसऱ्या दिवशी आदित्य, पारू व प्रीतम गावकऱ्यांना भेटायला गावात जातात आणि त्यांना आदित्य सांगतो की, आम्हाला या पेपर्सवर सह्या हव्या आहेत. यावर अहिल्यादेवींनी कोणत्याही पेपर्सवर सह्या करायचं नाही असं सांगितलं असल्याचं तेथील काही गावकरी सांगतात. तर काही गावकरी जमीनी द्यायला तयारही नसतात. ते म्हणतात की आम्ही पेपर्स वर सह्या करणार नाही. तेव्हा आदित्य सांगतो, हे तुमच्याच जमिनीचे पेपर्स आहेत ते अहिल्यादेवींनी सही करून मागितले आहेत. यावर काही गावकरी तयार नसतात तेव्हा पारू गावकऱ्यांना अहिल्यादेवींच्या विश्वासाची आठवण करून देते यानंतर गावकरी म्हणतात की, अहिल्यादेवींनी आम्हाला उभं केलं आहे आणि आज जर त्यांना आमच्या जमिनी हव्या असतील तर त्याच आम्हाला याच्यातून पुन्हा नव्याने उभं करतील याची खात्री आहे, असं म्हणत सगळे गावकरी पेपर्सवर सह्या करतात तर इकडे दिशा आणि तिची आई सगळेचजण जमलेले असतात. तेव्हा दामिनी दिशाला म्हणते, हे साम्राज्य जर राहिलं नाही तर तू किर्लोस्करांची सून होऊन काय करणार?, आज अहिल्यादेवींच्या चुकीमुळे हे साम्राज्य कोलमडून पडलं तर तू काय करणार?, हे ऐकून दिशा तिच्या आईला सांगते की, अहिल्या आंटीच्या चुकीमुळे हे काहीच साम्राज्य राहिलं नाही तर आपल्या भविष्याचं काय होणार?, यावर दिशाची आई सांगते की, ती अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे ती अशीच शांत बसणार नाही. त्यानंतर अहिल्याला आदित्यचा फोन येतो की, गावकऱ्यांच्या पेपर्सवर सह्या झाल्या आहेत. त्यावर अहिल्यादेवी सांगतात की, तुम्ही आता निघा तिथून.
मालिकेच्या पुढील भागात असे दाखवण्यात आले आहे की, अहिल्यादेवी गावकऱ्यांनी सह्या केलेले पेपर्स घेऊन सूर्यकांतकडे जातात. सूर्यकांतचा पीए सगळं काही नीट चेक करतो तेव्हा सूर्यकांत अहिल्यादेवींना म्हणतो की, प्रेम आणि कर्तव्यमध्ये तू प्रेम निवडलं आणि गावकऱ्यांचा विश्वास घात केला. आणि या सगळ्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या. असं म्हणत तो श्रीकांतच्या गळ्यावर चाकू धरताना दिसतो. आता अहिल्यादेवी यावर कोणतं पाऊल उचलणार?, श्रीकांतची सुखरूप सुटका करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.