‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी जेवल्याशिवाय पारू जेवायला नकार देते मात्र अहिल्यादेवी पारुला मी आता जेवणार नाही तुम्ही जेवायला सुरुवात करा असं सांगत आदेश देतात. मात्र पारू काही ऐकायला तयार होत नाही. तेव्हा गणीसुद्धा जेवायला बसलेला असतो अहिल्यादेवी जात असतात तितक्यात गणीचा आवाज ऐकून त्या थांबतात. गणी म्हणतो म्हणजे आज सुद्धा कोणी जेवणार नाही का?, अहिल्यादेवी जेवल्या नाही तर तायडी जेवणार नाही, तायडी जेवली नाही तर बाबा जेवणार नाही आणि बाबा जेवला नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. इतकं सोन्यासारखं अन्न समोर असताना ते जेवायचं नाही कितपत चांगलं आहे हे ऐकल्यावर अहिल्यादेवींनाही वाईट वाटतं आणि त्या सावित्रीला पान लावायला सांगतात आणि सगळ्यांना जेवायला बसायला सांगतात. (Paaru Serial Update)
तर दिशा व दामिनी मागाहून बसतो असं सांगत तिथेच थांबून राहतात. तेव्हा अहिल्यादेवी दिशा दामिनीला गाजराचा हलवा आणायला सांगतात. दामिनी गाजराचा हलवा आणायला जाते तेव्हा ती दिशाच्या सांगण्यावरुन गाजराच्या हलव्यामध्ये लाल तिखट मिक्स करते आणि ती घेऊन येते. तेव्हा अहिल्यादेवी ती वाटी उचलायला जातात तेव्हा दामिनी त्यांना थांबवते आणि सांगते की ही वाटी तुमच्यासाठी आहे. ही वाटी खास दिशाने तुमच्यासाठीच भरली आहे. पारूची वाटी घेऊन पारूला त्यातला एक घास भरवतात परंतु घास खाते तितक्यात तिला खूप तिखट लागतं मात्र ती काहीच बोलत नाही आणि देवी आई तेव्हा पारूला विचारतात, मी माझ्या हाताने बनवला आहे हा गाजराचा हलवा. गोड आहे ना?, यावर पारू सांगते की, हो तुम्ही मला भरवलात म्हणजे हा नक्कीच गोड आहे असं म्हणून ती मुकाट्याने सगळा गाजराचा हलवा खाते. मात्र पारू तेव्हा काहीच बोलत नाही त्यानंतर इकडे किचनमध्ये पारू अहिल्यादेवी जेवल्या यासाठी ती देवाचे आभार मानते तितक्यात दामिनी तिथे येते.
आणि दामिनी पारूला खूप काही बोलू लागते आणि सांगते की, इतका तिखट गाजराचा हलवा तू खाल्लास कसा?, तू नक्की आहेस तरी कोण असं म्हणत तिला ओरडू लागते आणि तिला सांगते की इतकी तुझी देवी आईवर श्रद्धा आहे तर तू डोळे बंद कर आणि तुझ्यासमोर देवी आई प्रकट होतात का ते बघ आणि तिला जबरदस्ती डोळे बंद करायला लावते. पारू डोळे बंद करते त्यानंतर दामिनीच्या मागे येऊनच अहिल्यादेवी उभ्या राहतात. पारू डोळे उघडते तर तिला समोर अहिल्यादेवी दिसतात मात्र दामिनीची पाठ असल्याने तिला दिसत नाहीत आणि दामिनी पारूला भिकारी आणि आमच्या पैशांवर जगणारी असं बरंचं काही बोलते हे ऐकून अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. अहिल्यादेवी दामिनीला म्हणतात की तू इथे काय करत आहेस?, मी तुझाच सत्कार करायला आले होते कारण आमची सगळ्यांची जेवण होईपर्यंत तू आज जेवायची राहिलीस. तू आज सूनेचं कर्तव्य पार पाडलं आहेस. थांब मी तुला स्वतःच्या हातानं गाजराचा हलवा भरवते असं म्हणत गाजराच्या हळव्यामध्ये त्या लाल तिखट मिक्स करतात आणि पारुला तो गाजराचा हलवा दामिनीला भरवायला सांगतात.
पारू दामिनीला एक घास भरवते तितक्यातच दामिनीला घाम फुटतो आणि खूप तिखट लागतं तेव्हा अहिल्या देवी दामिनीला म्हणतात की हा गाजराचा हलवा पारूने सर्व खाल्ला तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल याचा तू विचार तरी केला आहेस का?, माझं सगळीकडे लक्ष असतं, असं म्हणून तिला जायला सांगतात आणि पारूला सांगतात की, तू तेव्हाच थांबवायला हवं होत. तेव्हा पारू सांगते की, एका आईने, माझ्या देवी आईने स्वतःच्या हाताने बनवलेला हा गाजराचा हलवा मी न खाता त्याला नाव ठेवीन असं शक्य तरी आहे का?, हे ऐकून अहिल्यादेवींना भरून येतं. अहिल्यादेवी म्हणतात की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आता मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात काय होणार हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे.