‘पारू’ या मालिकेत खूप मोठा रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दामिनी व दिशा या पारूविरुद्ध कट रचत असतात आणि त्या अहिल्यादेवींच्या मनात पारुबाबत विष भरवतात. तर एकीकडे अहिल्यादेवी कोणतीही शाहनिशा न करता पारूला सुनावतात. शिवाय त्या पारूला आदित्यच्या खोलीत येण्यास बंदी असल्याचंही तिला सांगतात. दामिनी पारूवर आदित्यच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतात. तर अहिल्यादेवी यावर काहीच बोलत नाहीत. (Paaru Serial Promo)
अहिल्यादेवी याउलट पारूवर भडकतात म्हणून पारूही त्यांच्यावर चिडते आणि कामावरचं येत नाही. दुसऱ्या दिवशी कामावर येत नाही म्हणून किर्लोस्कर कुटुंबीय सगळेच पारूला मिस करत असतात. तर पारू कामावर नाही येणार असल्याचं सावित्रीला सांगते. आता मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेत आदित्यची तब्येत बिघडते तेव्हा अहिल्यादेवी स्वतः पारूजवळ येतात असं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
श्रीकांत डॉक्टरला फोन करुन सांगतात की, आदित्यला खूप ताप येत आहे. तुम्ही आता येऊ शकता का?, यावर डॉक्टर, पावसात अडकलो असल्याने येऊ शकत नसल्याचं सांगतात. तर इकडे अहिल्यादेवीला खूप काळजी वाटत असते. किर्लोस्कर घरातील सगळीच मंडळी आदित्याजवळ थांबलेली असतात. तेव्हा श्रीकांत सावित्रीजवळ पारूला बोलावून आण असा निरोप पाठवतो. सावित्री भर पावसात भिजत भिजत पारूच्या घरी येते. आणि पारूला सांगते की, “श्रीकांत सरांनी तुला बंगल्यावर बोलावलं आहे. आदित्य सरांना खूप ताप आला आहे. त्यामुळे तुला आताच्या आता त्यांनी बोलावलं आहे”. त्यावर पारू बंगल्यात यायला नकार देते.
यावर मारुती पारूच्या हाताला धरुन तिला खेचत बाहेर आणतो आणि बोलतो, “तू येत कशी नाहीस ते बघतो मी”. तेव्हा भर पावसात भिजत अहिल्यादेवी पारूच्या घराच्या अंगणात उभ्या असतात. आणि त्या पारूला आवाज देत म्हणतात, “आज मी तुझ्यासमोर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही तर एक आई म्हणून उभी आहे. मी तुला विनंती करते की, माझ्या मुलाला बरं कर”, असं म्हणताना दिसत आहे. आता अहिल्यादेवींच्या शब्दाखातर पारू बंगल्यात जाणार का?, पारूच्या उपचारांनी आदित्यला बरं वाटणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.