‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दुसऱ्यांदा पारूसह लग्न मोडल्यामुळे सगळेजण काळजीत असतात. हरीशही ऐन हळदीच्या दिवशी पळून गेल्यानंतर आता पारूचं लग्न कसं होणार?, पारूचं पुढे काय होणार?, या काळजीने मारुती आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करतो. मात्र किर्लोस्कर कुटुंब व पारू मिळून त्याला हे सगळं करण्यापासून थांबवतात आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतात. (Paaru Serial Promo)
पारूसुद्धा मारुतीला धीर देण्याचा प्रयत्न करते. तर सावित्रीचं बोलणं पारुला पटलेलं नसतं. सावित्री हे सगळं पारू स्वार्थासाठी करत आहे का?, असा आरोप पारूवर करते. त्यानंतर पारू हे सगळे ज्यामुळे सुरु आहे तो त्रास कायमचा संपवण्याचा निर्णय घेते. त्याआधी मंदिरात जाऊन देवाची माफी मागण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला आदित्यही मंदिरात पोहोचतो. पारू देवासमोर माफी मागत असताना आदित्य तिथे पोहोचतो. तेव्हा आदित्य पारूला विचारतो की, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस का?.
यावर पारू आदित्यला सगळं खरं सांगायचं ठरवते. आदित्य सर जाहिरातीत आपण लग्न झालं, विधी झाले हे जाहिरातीतलं लग्न हरीश सरांबरोबर होणार होते पण तुम्ही त्या जागी बसलात. हे जाहिरातीतल्या लग्न मी खरं मानलं आहे. जाहिरातीच्या दिवशी तुम्ही माझ्या गळ्यात बांधलेला मंगळसूत्र आजही माझ्या गळ्यात आहे, असं म्हणत ती आदित्यला मंगळसूत्र दाखवते. हे बघून आदित्यला धक्काच बसतो. तर पारुवर आदित्य भडकतो आणि तिला सांगतो की, ते जाहिरातीतले लग्न होतं तू असा विचार का करत आहेस?. हे जर सगळ्यांसमोर आलं तर, आधीच आई माझ्याशी ही गोष्ट लपवून ठेवली म्हणून बोलत नव्हती आता तुला काय माझ्या आईपासून मला तोडायचे आहे का?.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या गोलीने १६ वर्षांनी सोडली मालिका, म्हणाला, “मी आता खूप…”
आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमध्ये पारू गळ्यातील मंगळसूत्र काढून देवाच्या चरणाशी ठेवताना दिसत आहे. देवा मी माझं सुख बघितलं तर मी स्वार्थी होईन. त्यामुळे हे मंगळसूत्र तुझ्या स्वाधीन करते असं म्हणत ती सौभाग्याची अग्निपरीक्षा देते. मंगळसूत्र काढून ठेवताच इकडे आदित्य मोठ्या ट्रकच्या समोर येतो. आता पारूने काढलेल्या मंगळसूत्रामुळे हे सारं आदित्यच्या जीवावर बेतणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.