‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गावाकडील पारूचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या करारीपणा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर पारू भोवती फिरणार हे मालिकेचं कथानक साऱ्यांनी उचलून धरलं आहे. मालिकेत पारू व आदित्य यांच्यात फुलत जाणार प्रेमही पाहायला मिळत आहे. (Paaru Serial New Promo)
सध्या मालिकेत सूर्यकांत कदम व अहिल्यादेवी यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. या प्रोमोमध्ये पारू व आदित्य यांच्यातील प्रेमाची चाहूल पाहायला मिळत आहे. सदर प्रोमो हा किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडसाठी शूट केला असल्याचं समोर आलं आहे.
मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पारू व आदित्य यांच्या शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. ब्रँडच्या शूटसाठी दोघेही वधूवराच्या रूपात तयार झालेले दिसत आहेत. यांत पारूचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे आकर्षक दागिने, नऊवारी साडीमध्ये पारू खूपच सुंदर दिसत आहे. तरआदित्यही पारंपरिक अंदाजात उठून दिसत आहे. लग्नासाठी तयार झाल्यानंतर आदित्य पारूसमोर येताच तिला हात देताना दिसत आहे. तर त्यांनंतर त्यांचे लग्नाचे विधी पूर्ण होताना दिसत आहेत.
या प्रोमोमध्ये लग्न झाल्यानंतर समोरून दिग्दर्शक ओरडून सांगत आहे की, “कट, पारू तू खूप छान अभिनय केला”. त्यानंतर त्यांची टीम पारूच्या गळ्यातून हार, हातातून बांगड्या काढून घेताना दिसत आहे. आणि अगदी शेवटी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र राहतं. तेव्हा कोणीतरी आवाज देत मंगळसूत्र राहिल्याचं सांगत. त्यावर पारू घाबरते आणि म्हणते की, “काही झालं तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही”. आता ब्रॅण्डसाठी केलेलं हे नाटक पारूच्या आयुष्याला कलाटणी देणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.