Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, अवॉर्ड फंक्शनसाठी आदित्य, पारू, अनुष्का हे प्रवास करत असतात. दरम्यान ते एका गावामध्ये वस्तीला थांबतात. अनुष्काला काही करुन आदित्यला जीवे मारायचं असतं. तर इकडे त्याच्या मनात स्वतःबद्दल आदरही निर्माण करायचा असतो. दोन्ही गोष्टी ती तिच्या परीने करण्याचा प्रयत्न करत असते. तर पारू अनुष्काला व आदित्यला एकत्र पाहून खूप चिडचिड करताना दिसते. त्याच वेळेला नानूच्या मदतीने ती आदित्यला जळवण्याचा प्रयत्न करते. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का पारुसमोर बसून तिच्याकडून आदित्यसाठी पत्र लिहून घेते. पारू स्वतःच्या भावना त्या पत्रामध्ये मांडते. त्यानंतर ते पत्र अनुष्का आदित्यला द्यायला सांगते. तेव्हा पारू नकार देते.
तेव्हा पारूला अनुष्का सांगते की, ही तुझ्या मालकिणीची ऑर्डर आहे. त्यामुळे तुला हे पत्र नेऊन आदित्यला द्यावच लागेल. पारू आदित्यला पत्र नेऊन देते. तेव्हा आदित्य पारूलाच पत्र वाचायला सांगतो. तितक्यात अनुष्का तिथे येते. आदित्य ते पत्र ऐकून खूप खुश होतो आणि विचारतो, हे माझ्यासाठी अनुष्काने लिहिलं आहे का?. यावर अनुष्का नाही असं म्हणते आणि म्हणते की, हे पत्र पारूने लिहिलं आहे पण भावना माझ्या आहेत. अनुष्का असं म्हणताच पारू तिथून निघून जाते.
आणखी वाचा – आधी हिंदू आणि आता ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकली कीर्ती सुरेश, पतीबरोबरचे रोमँटिक फोटो समोर
तेव्हा आदित्यला कळत नाही की, पारू असं नेमकं का वागत आहे. त्यानंतर तो पारूला बाहेर भेटतो आणि विचारतो की, तू नेमकं असं का वागत आहेस. तेव्हा पारू रागा रागात बोलून जाते की, तुम्हाला अनुष्का मॅडम खरंच आवडतात का?, याचं फक्त मला उत्तर द्या. यावर आदित्य म्हणतो, हा काय प्रश्न झाला का?. यावर पारू म्हणते, हो आता तुमचं लग्न ठरलं आहे ना म्हणजे तुम्हाला त्या नक्कीच आवडत असतील. जर तुम्ही अनुष्का मॅडमशी लग्न केलं तर… असं म्हणून ती शांत होते. यावर आदित्य म्हणतो तर काय तेव्हा पारू बाजू सांभाळत म्हणते की, जर तुम्ही त्या अनुष्का मॅडमशी लग्न केलं तर त्या दिवशी मी सुट्टी घेईल.
आणखी वाचा – झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
मला सुद्धा तुमच्या लग्नात मजा करायची आहे. हे ऐकल्यावर आदित्यचा जीव भांड्यात पडतो. तर इकडे अनुष्का तिच्या माणसाला आदित्यला ठार मारून टाकण्यास सांगते. तेव्हा तो माणूस पारूला तुम्ही बाजूला करा असे सांगतो. तर आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अनुष्का नानूला सांगून पारूच्या कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.