Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. मालिकेत सध्या आदित्य, पारू आणि अनुष्का अवॉर्ड फंक्शनसाठी निघालेले असतात. जाताना ते एका गावातील फार्म हाऊस वर राहण्यासाठी जात असतात. वाटेत जात असतानाच आदित्यच्या गाडीचा टायर पंचर होतो तेव्हा तो पारूची खोड मोडायला म्हणून नोकर माणसांनी असली काम करायची असतात असं सांगून पारूला पंक्चर काढायला सांगतो आणि तो अनुष्काला घेऊन एकांतात बोलायला म्हणून बाजूला जातो. अनुष्काचा मारेकरी त्यांच्या पाठीवर असतो मात्र आयत्या वेळेला आदित्य अनुष्काला सांगतो की, पारू तिकडे एकटीच आहे आणि तिला ते काम येतही नाही. उगीच काहीतरी तिला दुखापत व्हायला नको आपण तिकडे जाऊया असं म्हणतो.
तेव्हा अनुष्का तिकडे जायला निघते त्याच वेळेला पारूला तिथं नानू भेटलेला असतो आणि तो पारूची मदत करतो. गाडीचा पंचर काढून देण्यात नानूने पारुला मदत केलेली असते. आदित्य येऊन पाहतो तर पारूने टायर बदललेला असतो हे पाहून आदित्य खुश होतो आणि तिला विचारतो हे तू केलस का?, यावर पारू सांगते की, नाही हे सगळं काही नानूने केलं आहे. तर नानू पारुला पाहून हुरळून जातो. आदित्यला जळवण्यासाठी पारू देखील नानूचे मुद्दाम आभार मानताना दिसते आणि त्याचं कौतुक करताना दिसते. त्यानंतर कळतं की नानू हा आदित्य आणि राहणाऱ्या फार्म हाऊसचा केअरटेकर आहे. आदित्य अनुष्काला सांगतो की मला तुझ्याबरोबर बऱ्याच दिवसांपासून लॉंग ड्राइव्हला जायचं होतं.
आणखी वाचा – लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका आपटे झाली आई, दाखवली बाळाची पहिली झलक, स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल
आज या निमित्ताने आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया पारू येईल चालत चालत असेही दोन किलोमीटरचाच हा प्रवास आहे. हे ऐकल्यावर पारूला राग येतो. पारू सांगते की, हो चालेल मी चालत चालत येईनच. त्यानंतर आदित्य गाडीत बसायला जातो तेव्हा पारू नानूला थांबवते आणि त्याच्या सायकलवर त्याच्या पाठीमागे बसून जाऊ लागते. पारूला नानूच्या पाठीमागे बसलेलं पाहून आदित्यला आणखीनच वाईट वाटतं आणि तो रागा रागात हळूहळू त्यांच्या मागोमाग गाडी चालवू लागतो. त्याच वेळेला आदित्यला प्रीतमचा फोन येतो तेव्हा प्रीतम सांगतो की, गुरुजींचा एक्सीडेंट होता होता वाचला. मी त्यांना आत्ताच पत्रिका देऊन आलोय. तर इकडे आदित्य पारू बरोबर नसल्याने रागराग करत असतो. हे प्रीतमच्या लक्षात येतं आणि प्रीतम मनातल्या मनात म्हणतो की, दादा पारु नसल्यावर किती कासावीस होतो हे दादाला केव्हा कळणार हेच हे कळत नाहीये.
तर अनुष्काच्या प्लॅन नुसार मोहन व गुरुजींच्या गाडीचा एक्सीडेंट होता होता वाचलेला असतो. त्यामुळे गुरुजी घरी येण्यास नकार देतात आणि पत्रिका पाहून अहिल्यादेवींना फोन करुन सांगतात की, गरीब घरातील आईविना वाढलेली ही आदित्यची बायको असणार आहे. यावर अहिल्यादेवी सांगतात पण अनुष्का ही श्रीमंत घरातील मुलगी आहे तिचा स्वतःचा असा व्यवसाय आहे. हे ऐकल्यावर गुरुजी लगेच म्हणतात मग ती मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.