रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial :  आदित्यच्या सुखी आयुष्यासाठी पारूने केली मंगळागौरीची पूजा, अहिल्यादेवींसमोर खरं सत्य येणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial Update

पारू मालिकेत पारूने केली मंगळागौरीची पूजा, दिशा-दामिनीसमोर सत्य येणार का?

Paaru Marathi Serial Update :  ‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे मारुती गनीचा अभ्यास घेत असतो. त्याच वेळेला सावित्री येते आणि सांगते की, मला पारुशी कामासंबंधात बोलायचे आहे तेव्हा मारुती सांगतो की, पारू आत मध्येच आहे. त्यानंतर पारूकडे सावित्री जाते आणि सांगते की, लग्नानंतर बाईने पहिली मंगळागौर ही करायची असते. त्यामुळे मला असं वाटतंय की आदित्य बाबाच्या सुखी आयुष्यासाठी तुलाही मंगळागौर पूजा करावीच लागेल. यावर पारू सांगते, पण ती कशी करायची. काय करायचं हे मला काहीच माहिती नाही. यावर सावित्री सांगते की, तू काही काळजी करु नकोस. मी तुला मदत करीन. यावर पारूला सावित्री सांगते की, सकाळी मी पूजा मांडून ठेवीन तोवर तू बंगल्यात जाऊन काम कर. मी फोन केल्यावर तू इकडे ये आणि त्यानंतर मी तिकडे जाईन म्हणजे आपण दोघीही नाही आहोत यामुळे कोणताच गोंधळ होणार नाही. ठरल्याप्रमाणे सगळं काही होत असतं तर दुसऱ्या दिवशी पारू किचनमध्ये काम करत असतानाच तिला दामिनी धरते आणि सांगते की, आज माझ्यासाठी हे खास पदार्थ बनव आणि हे पदार्थ बनेपर्यंत तू किचन मधून बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, असं म्हणत दामिनी स्वतःच किचनमध्ये बसून राहते.

तर इकडे सावित्री पारूला सतत फोन करत असते मात्र पारू ते फोन उचलत नाही. त्यानंतर सावित्री पारूला बोलवायला येते तेव्हा दामिनीला पाहून ती शांतच राहते. दामिनी विचारते, तुमचं काय सुरु आहे. एक गेली की दुसरी येते. तुम्ही काम चुकारपणा करताय का?, यावर सावित्री सांगते नाही तुम्हाला ब्रोकोली सलाड आणि ज्यूस आवडतं पण ब्रोकोली संपली होती म्हणून मी कोणाला तरी आणायला सांगणार होते पण मला कोणी सापडलं नाही म्हणून मी पारुला सांगायला आले असं सांगून ती पारूला ब्रोकली आणायला पाठवते. हे ऐकून दामिनी खूप खुश होते. दामिनी सावित्रीला सांगते की, तू अशी माझी काळजी घेत आहेस, हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यानंतर पारू घरी येते पण ती पूजा नेमकी कशी करायची हे तिला कळत नाही म्हणून ती सावित्रीला फोन करते यावर दामिनी सावित्रीचा फोन घेते आणि सांगते की आता तू हा फोन उचलायचा नाही. त्यानंतर पारू प्रियाला फोन करते.

आणखी वाचा – “गेम कळला नाही पण…”, Bigg Boss च्या घरात कचरा, धुनी-भांडी करतो सूरज चव्हाण, काही स्पर्धकही भावुक, पण कमी लेखणं का?

प्रिया पारूचा फोन उचलते तेव्हा अहिल्यादेवी तिच्याबरोबर असतात आणि मंगळागौरीची पूजा करण्याबद्दल प्रिया पारूला विचारते. अहिल्यादेवी तिच्याकडून फोन काढून घेतात. आता खोटं कसं बोलावं म्हणून अहिल्यादेवींना पारू सांगते की, माझ्या मैत्रिणीची पूजा आहे. ती कशी करावी तिला माहित नाही म्हणून मी प्रिया मॅडमला विचारलं त्या गावाकडच्या आहेत म्हणजे त्यांना माहीत असेल असं मला वाटलं. त्यावर अहिल्या देवी स्वतः पूजा कशी करायची सांगतात. तर एकीकडे दिशाने नवीन डाव आखलेला असतो. दिशा प्रीतमला ब्लॅकमेल करते की, तू त्या प्रियाच्या जवळ जाणं बंद कर. नाहीतर प्रियाला बॅग भरून गावाकडे पाठवून देईल आणि हे मला करायला वेळ लागणार नाही आणि असं तुला नको हवं असेल तर तू माझे फोटोज दाखवून कंपनीच्या ब्रँड अंबेसिडरसाठी सासू मॉमशी बोल. हे ऐकल्यावर प्रीतम पहिला नकार देतो मात्र प्रियासाठी तो हे करायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण बसलेले असतात तेव्हा प्रीतम याबद्दल अहिल्यादेवींशी बोलतो आणि काही फोटो दाखवतो मात्र अहिल्यादेवी श्रीकांत आदित्य सगळे हसतात. अहिल्यादेवी सांगतात हे करायची तुला काहीच गरज नाही. आपली ब्रँड अँबेसिडर पारू आहे आणि पारू आता या पदासाठी योग्य आहे. तुला हवं असेल तुला कामच हवं असेल तर तू आदित्य किंवा प्रीतमला मदत कर.

आणखी वाचा – Keshavrao Bhosale Theatre Fire : ऐतिहासिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जाळून खाक, कलाकारांना अश्रू अनावर, नेमकं काय झालं?

आदित्य सांगतो हवं तर तू एखादी ब्रांच आपली पूर्ण सांभाळायला घे हे ऐकल्यावर दिशा तिथल्या तिथे डाव पलटते आणि सगळं काही प्रीतमने मुद्दाम केलं असल्याचं सांगते. तेव्हा आदित्य प्रीतमवर भडकतो आणि तिला सॉरी म्हणायला सांगतो. प्रीतम जेव्हा सॉरी म्हणायला जातो तेव्हा प्रिया तिच्या मागून जाते. तेव्हा प्रियाला कळतं की दिशाने हे सगळं काही नाटक केलं आहे. आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru marathi serial update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Riteish Deshmukh wife Genelia praised and said that she is proud of him.

बायको असावी तर अशी! Bigg Boss Marathi मधील रितेशच्या कामाचं जिनिलीयाकडून कौतुक, म्हणाली, “प्रिय नवरा तू खूप …”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.