गुरूवार, जून 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवरा, घरापासून दूर असलेल्या पारूने सेटवरच साजरी केली वटपौर्णिमा, शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधूनही वेळ काढत जपली परंपरा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru fame sharayu sonawane

Video : नवरा, घरापासून दूर असलेल्या पारूने सेटवरच साजरी केली वटपौर्णिमा, शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधूनही वेळ काढत जपली परंपरा

Paaru fame sharayu sonawane : कलाकार मंडळी म्हटलं की त्यांना शूटिंगसाठी त्रास हा सहन करावाच लागतो. बरेचदा अशी काही कलाकार मंडळी आहेत ज्यांना शूटिंग लोकेशन घरापासून दूर, बाहेरच्या शहरात असल्याने त्यांना लांब जावे लागते. ही मंडळी सुट्टीच्या दिवशी घराकडे परततात. इतकंच नाही तर या कलाकार मंडळींना त्यांच्या घरापासून दूर राहून काम करावे लागते. विशेषतः मालिकेतील कलाकरांना हा त्रास सहन करावा लागतो. मालिकेच्या शुटिंगचे लोकेशन्स हे गावाकडे आल्यावर तर ही समस्या अधिक भेडसावते. असंच काहीस झालं आहे पारू मालिकेतील कलाकारांचं. पारू मालिकेचं शूटिंग हे सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे मालिकेतील ही कलाकार मंडळी शुटिंगनिमित्त घरापासून दूर आहेत.

अशातच ‘पारू’ मालिकेतील पारूने म्हणजेच शरयू सोनावणेने शुटींगच्या वेळातून वेळ काढत सेटजवळच वटपौर्णिमा साजरी केली आहे. वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत तिने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शरयूने अगदी शॉर्ट कुर्ती आणि लेगिन्स परिधान करतच व्यस्त वेळापत्रकातून परंपरा जपली आहे. यावेळी तिने ड्रेसिंगला प्राधान्य न देता परंपरेला प्राधान्य दिलं. शरयूने शेतजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाला सात फेरे घेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. हा व्हिडीओ तिने तिचा पती जयंत लादेलाही टॅग केला आहे.

आणखी वाचा – देशमुखांच्या सूनेचे संस्कार, जिनिलीया देशमुखने परंपरा जपत घरच्या घरीच साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “नवरा…”

View this post on Instagram

A post shared by SharayuSonawane (@sharayusonawaneofficial)

अभिनेत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नामुळे खूप चर्चेत राहिली. शरयूने तिच्या लग्नाच्या थेट वर्षभराने लग्न केलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अभिनेत्रीच्या या आनंदाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. थेट लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच शरयूने लग्नसोहळ्यात खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. पारूने निर्माता जयंत लादेसह साखरपुडा समारंभ उरकत त्याचे काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी केव्हा लग्न केलं हे कळलच नाही.

आणखी वाचा – पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

जयंत व शरयू अनेकदा त्यांचे एकत्र असतानाचे फोटो शेअर करत असतात. शूटिंगच्या वेळातून वेळ काढत ते एकमेकांना वेळ देतात. शरयू मालिकेच्या शूटिंगसाठी सातारा येथे आहे तर जयंत त्याच्या कामानिमित्त पुणे, मुंबई हा दौरा करत असतो. मात्र वेळ मिळाला की ते दोघेही एकमेकांना भेटतात. पारू मालिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं.

Tags: marathi serialpaarusharayu sonawane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Entertainment

Gambling enterprises mit Mastercard: A Convenient and Secure Repayment Alternative

जून 12, 2025 | 2:17 am
Entertainment

The Ultimate Overview to No Betting Deposit Perks

जून 12, 2025 | 2:16 am
Entertainment

Discover the Thrilling Globe of Blackjack Gamings for Enjoyable

जून 11, 2025 | 9:23 pm
Aamit bhanushali talk about father
Entertainment

काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

जून 11, 2025 | 6:30 pm
Next Post
Dipika Kakar in hospital

Video : दीपिका कक्करला रुग्णालयाच्या बेडवर पाहून हळहळला दोन वर्षाचा लेक, हात सुजलेला दाखवला अन्...; भावुक क्षण समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.