सध्या सर्वत्र मतादानाची धामधूम पाहायला मिळत आहे. या मतदानात कलाकार मंडळींनीही उत्साहाने भाग घेतला आहे. मराठी कलाकार मंडळी मतदानात भाग घेत असून मतदानाचा हक्क बजावणायचे आवाहन करत आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदार संघात नाव न आल्याने किंवा मतदार यादीतील नाव चुकणे यासारख्या अनेक घटना कानावर ऐकू येत आहेत. याबद्दल प्रत्येकवेळी मतदार जबाबदारी व जागरुकता म्हणून आपली तक्रार निवडणूक आयोगाकडे करतात. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. (Mugdha Karnik Angry On Voting System)
बऱ्याच कलाकार मंडळींनीही मतदान करायला न मिळाल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच अभिनेत्री मुग्धा कर्णिक हिचं मतदार यादीत नाव नसल्याने तिला मतदान न करताच परत यावे लागले आहे. याबद्दल तिने सोशल मीडियाद्वारे संतापजनक पोस्ट शेअर करत मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुग्धा झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असते.
आणखी वाचा – मतदानासाठी सिनेसृष्टीही सरसावली, कलाकारांमध्ये मतदानाचा उत्साह, फोटो केले शेअर

सोशल मीडियावरुन मतदानाचा हक्क बजावताना न आल्याने अभिनेत्रीने खास स्टोरी पोस्ट करत तिचं मत व्यक्त केलं आहे. “६ तासांचा प्रवास फक्त मी माझे मत देण्यासाठी केला पण मुंबईतील अनेक लोकांप्रमाणे माझेही नाव मतदार यादीत नव्हते. मी गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत माझे मत दिले आहे, परंतु या वर्षी मला माझा हक्क बजावता येणार नाही. पण कृपया मुंबईकरांनो यादीत तुमचे नाव शोधा आणि मतदान करा”, असं म्हणत अभिनेत्रीने तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.
‘पारू’ मालिकेच्या चित्रीकरणामुळे मुग्धा सध्या घरापासून दूर आहे. मुग्धा ही मूळची मुंबईची आहे. सध्या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यात सुरु असल्याने केवळ मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून तिने सातारा ते मुंबई प्रवास केला. मात्र ६ सहा तासांचा प्रवास करुन आल्यानंतर मतदान यादीत नाव नसल्याने तिला हा हक्क गमवावा लागला असल्याचं समोर आलं आहे.