Diseases Caused Sitting In Toilet : आपला रोजचा दिनक्रमच आपल्याला अडचणीत पडण्यास मदत करतो. म्हणजे रोजच्या आपल्याच वाईट सवयी या आपल्या अंगाशी येतात. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्यावर टॉयलेटला जाणे. हो. सकाळी उठल्यावर टॉयलेटला जाणे ही चांगली सवय असली तरी आता तीच घातक ठरतेय. कारण या चांगल्या सवयीत आपण आणलेल्या आपल्या सोयीनुसारच्या वाईट सवयी. टॉयलेटमध्ये १५ मिनिटांहून अधिक काळ बसणे, मोबाईल फोन घेऊन जाणे या सवयी आपल्या शरीराला हानी पोहचवू शकतात. जितका वेळ अधिक बसू तितकं पोट साफ होईल हा अनेकांचा गैरसमज आहे मात्र हा समज पूर्णतः चुकीचा आहे. आणि असे करणेच आपल्या आरोग्यास हानिकारक ठरु शकते.
टॉयलेटमध्ये १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसणं हे पचनसंस्थेशी संबंधित समस्या आणि गंभीर त्रासांचे लक्षण आहे. न्यूट्रिशनिस्ट सोनिया नारंग यांच्या मते, ही सवय सोडली नाही तर पाइल्स, बद्धकोष्ठता, ब्लॅडर कमकुवत होणं, इन्फेक्शन अशा विविध समस्या उद्भवू शकतात. ही सवय आरोग्यास कशी हानिकारक आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…
आणखी वाचा – १५ वर्ष वेश्याव्यवसाय, आता घरी गेली पण आतमध्ये न घेताच…; ‘ती’चं एकटीचं आयुष्य, मुलाला वाढवण्यासाठी…
मूळव्याधची शक्यता
जर तुम्ही रोज सकाळी टॉयलेटमध्ये २० ते २५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ घालवत असाल, तर यामुळे गुदद्वारावर आणि आसपासच्या रक्तवाहिन्यांवर अनावश्यक ताण येतो. यामुळे त्या भागाला सूज येऊ शकते आणि हेमोरॉइड्स म्हणजेच पाइल्स किंवा मूळव्याध हा आजार होऊ शकतो. ओटीपोटातील रक्तप्रवाहही मंदावतो, ज्यामुळे स्थानिक नसांमध्ये दाब वाढतो. यामुळे वेदना, जळजळ, रक्तस्राव किंवा खाज येणं यासारखे त्रास होतात. ज्यांना पाइल्स हा आजार आहे त्यांनी ही सवय पूर्णतः बंद करायला हवी, तर त्यांना लवकर आराम पडेल.
बद्धकोष्ठतेचा सामना
टॉयलेटमध्ये अधिक काळ बसल्याने पोट साफ होतं नाहीतर उलट यामुळे आतड्यांवर अधिक दाब येतो, आणि त्यामुळे मल अधिक कठीण होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते आणि शरीराची नैसर्गिक वेळेवर मल विसर्जन करण्याची सवय बिघडते.
आणखी वाचा – आई तशी लेक! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण, म्हणाली, “मला प्रेम दिलंत तसं…”
ब्लॅडर कमकुवत होणे
सतत आणि जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसणं हे ओटीपोटातील स्नायूंवर परिणाम करतं. यामुळे युरिनरी लिकेज सारखी समस्या उद्भवू शकते. ही समस्या वाढल्यास वैद्यकीय उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. वृद्धापकाळात ही सवय अधिक जाणवू लागते त्यामुळे टॉयलेटमध्ये अधिक काळ बसण्याची सवय वेळीच मोडा.
बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव
टॉयलेट म्हणजे बॅक्टेरियाच घर. डोळ्यांनी न दिसणारे मायक्रोब्स हवेत फिरत असतात. आणि आपण टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाते त्यावर ते बसू शकतात. आणि हा फोन आपण तोंडाजवळ, अन्न खाताना, किंवा बेडवर ठेवतात यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आणि अधिक काळ टॉयलेटमध्ये बसल्याने आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय होतो.