बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई तशी लेक! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण, म्हणाली, “मला प्रेम दिलंत तसं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 18, 2025 | 12:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rujuta Deshmukh Daughter

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण

Rujuta Deshmukh Daughter : सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुलंही याच क्षेत्रात आपलं करिअर करु पाहतात. आई-वडिलांच्या पायावर पाऊल टाकत ही मुलं सिनेसृष्टीत स्वतःच नाव कमावतात. आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपली मुलं आपल्यामागे हा अभिनयाचा वारसा पुढे नेत असल्याचा त्यांना अभिमान आहे. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीनेही सिनेसृष्टीत पदार्पण केलं असल्याचं समोर आलं आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे ऋजुता देशमुख.. ऋजुता सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सासूबाईंच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. आई मालिकेत आणि आता लेक मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हो ऋजुताची लेक साजिरी जोशी आता लवकरच मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता हा चेहरा समोर आला आहे. तर हा चेहरा आहे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्रीण जाईचा. त्यामुळे आता ही गँग एकत्र आल्याने ‘एप्रिल मे ९९’ ची सुट्टी अविस्मरणीय ठरणार हे नक्की. जाईची भूमिका साकारणारी साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची मुलगी असल्याने अभिनयाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला आहे.

आणखी वाचा – तरीही जिद्द कायम! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांची झालीय अशी अवस्था, चालणं कठीण तरीही व्यायम करुन…

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हुशार, समजुतदार, गोड, दिलखुलास अशी जाई या तीन मित्रांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसत आहे. दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी मी साजिरीची ऑडिशन घेतली होती. परंतु त्या व्यक्तिरेखेशी ती मिळतीजुळती नसल्याने तिची निवड झाली नाही. परंतु तिची निरागसता, कुरळे केस, बोलके डोळे, हावभाव माझ्या लक्षात राहिले. त्यामुळे हे माझ्या मनात होतेच, की जेव्हा मी एखादा चित्रपट बनवेन तेव्हा साजिरीला नक्की एखादी भूमिका देणार. ‘एप्रिल मे ९९’ बनवताना साजिरीलाच डोक्यात ठेवून ‘जाई’ची व्यक्तिरेखा लिहिण्यात आली. तिच्या अभिनयात सहजता व नैसर्गिकता असल्याने जाई अनेकांना आपल्यातलीच एक वाटेल. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले तशीच जाईही प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

आणखी वाचा – “प्रत्येक स्त्रीसह शारीरिक संबंध ठेवणारा…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे सहकलाकारावर गंभीर आरोप, व्हिडीओ समोर आल्यानंतर…

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ एप्रिल मे ९९ हा प्रत्येकाला नोस्टालजिक अनुभव देणारा चित्रपट आहे. त्यासाठी आम्हाला तीच निरागसता, खट्याळपणा असलेले चेहरे हवे होते आणि आर्यन, श्रेयस, मंथन व साजिरी यासाठी योग्य निवड आहे. साजिरीचे गोड हास्य, उत्तम अभिनय संपूर्ण चित्रपटाला ताजेपणा देतो”. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: marathi movieRujuta Deshmukh Daughtersajiri joshi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
rishikesh river rafting accident viral video

ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग करताना तरुणाचा वेदनादायी शेवट, मित्रांनी डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला अन्...; Video व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.