Suraj Chavan Emotional : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. बारामती इथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर राजकीय क्षेत्रातील तसेच कलाक्षेत्रातूनही भावनिक प्रतिक्रिया आल्या आहेत. ‘बिग बॉस’ मराठी फेम सूरज चव्हाणसाठी ते फक्त राज्याचे मुख्यमंत्रीच नव्हेत तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या जाण्यानं सूरज चव्हाणवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अजित पवारांना अखेरचा निरोप द्यायला जनसमुदाय लोटला आहे. अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांना पुष्पचक्र वाहत राजकीय नेत्यांनी तसेच कलाकार मंडळींनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्टेजवर अभिनेता अमोल कोल्हे आणि अभिनेता रितेश देशमुख दोघांची उपस्थिती पाहायला मिळाली. अजित दादांना शेवटचं पाहायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला हे दोन्ही कलाकार उपस्थित होते. यावेळी दोघेही भावुक झाल्याचं दिसलं.
आणखी वाचा – Video : अजित पवारांना शेवटचं पाहायला अभिनेते रितेश देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित, पुष्पचक्र अर्पण केलं आणि…
तर ‘बिग बॉस’ फेम सुरज चव्हाण देखील अजित पवारांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचला. अजित दादांचे अंतिम दर्शन घेताना सूरज खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला. याचं व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने भावुक कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं, “आई वडीलांनंतर मी तुमच्यात माझं आई-आप्पा पाहत होतो, आणि तुम्ही पण मला सोडून गेलात, आता या पोरक्या सूरजने आता कोणाकडे बघायचं MISS YOU DADA” असं भावुक कॅप्शन दिल आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. आणि सांगितल्याप्रमाणे अजित पवार यांनी सूरज चव्हाणला दोन मजली आलिशान घर बांधूनही दिलं होतं. सूरजने पाहिलेलं घराचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम अजित पवारांमुळे पूर्ण झालं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम विजेता स्पर्धकाचा संसार मोडला? चाहत्यांमध्ये ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण




