Priyadarshan Jadhav Emotional Post : कलाकारांना अनेकदा वाईट प्रसंगांना समोर जावं लागतं. तणाव, नैराश्य, कामाचा अभाव अशा अनेक अडचणींचा सामना करत हे कलाकार आपलं आयुष्य जगात असतात. अनेक कलाकार याबद्दल व्यक्त होताना दिसतात. अशातच नुकतीच अभिनेता प्रियदर्शन जाधवने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये प्रियदर्शन जाधव गेल्या काही महिन्यांपासून तणावातून जात असल्याचं सांगितलं आहे.
अभिनेता प्रियदर्शन जाधवने एप फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून मी तणाव, चिंता, नैराश्याचा अनुभव घेत आहे, काम करुन थकलो आहे, नवीन चित्रपट केला नाही. नाटक केलं नाही किंवा टेलिव्हिजनवरही काही नवीन नाही, नाटक लिहिलं नाही, चित्रपट लिहिला नाही. एकाग्रतेचा अभाव, कामाचे प्रकल्प उशिरा सुरु होत आहेत, रिलीज होण्यास उशीर होत आहे. लोकांपासून दूर पळून जात आहे, खूप आनंदी असतो आणि त्याच वेळी वैयक्तिक पातळीवर अत्यंत असुरक्षित असतो, रागावलेला असतो. तसेच ध्येयहीन दिवस असतो, कधीकधी झोपेचा अभाव असतो. या सर्व गोंधळात यूएसए टूर माझ्यासाठी एक वरदान होती. हा फोटो लास वेगासमध्ये काढला आहे. मी संपूर्ण रात्र कॅसिनोमध्ये माझे नशीब आजमावत जागा होतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी २०३ डॉलर्स जिंकलो, पैसे घेतले आणि आम्ही सर्वजण अॅरिझोना ग्रँड केनियाला गेलो आणि खूप मजा केली. म्हणून कधीकधी अशांत काळात विनोद अशक्य गोष्टीवर विजय मिळवू शकतो. प्रेम तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून मार्ग काढून देऊ शकते. वाईट नशीब आवाज करतं, पण शहाणपणाला शांतपणे माघार कधी घ्यायची हे माहित असतं. मला आशा आहे की सर्वकाही ठीक होईल.” (Priyadarshan Jadhav Emotional Post)




