शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्टेजवर संपूर्ण कुटुंब उभं, मुकेश अंबानींचा नातू पाय घसरुन पडला अन्…; पुढे चिमुकल्याने देवाचं नाव घेताच संस्कारांचं होतंय कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 3:28 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Nita and Mukesh Ambani grandson Prithvi welcoming the guests at the reception by saying Namaste is video viral on social media.

Video : स्टेजवर संपूर्ण कुटुंब उभं, मुकेश अंबानींचा नातू पाय घसरुन पडला अन्...; पुढे चिमुकल्याने देवाचं नाव घेताच संस्कारांचं होतंय कौतुक

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे १२ जुलै २०२४ रोजी लग्न झाले. यानंतर अंबानी कुटुंबाने नवविवाहित जोडप्यासाठी शुभ आशीर्वाद आणि मंगल उत्सवसारखे कार्यक्रम आयोजित केले होते. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे दुसरे रिसेप्शन काल १५ जुलै २०२४ रोजी झाले. या कार्यक्रमात संपूर्ण अंबानी कुटुंबाने आपल्या स्वागत भाषणाने सर्वांची मने जिंकली. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांचा लहान नातू पृथ्वीने असे काही केले की, सर्वांची मनं जिंकली.

नीता अंबानी यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पाहुण्यांना अभिमानाने ओळख करुन दिली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करून दिल्यानंतर नीता अंबानींनी त्यांचा नातू पृथ्वीचे मंचावर स्वागत केले. पृथ्वी हा मुकेश व नीता अंबानी यांचा मोठा नातू आहे. यावेळी आकाश अंबानी व श्लोका मेहता यांचा मुलगा पृथ्वी निळा कुर्ता आणि पांढऱ्या पायजमामध्ये खूपच क्यूट दिसत होता. मंचावर उपस्थित असलेल्या आजी नीता यांनी पृथ्वीचे नाव पुकारताच तो स्टेजच्या दिशेने धावत आला आणि वाटेत धडपडला.

View this post on Instagram

A post shared by Times Applaud Trends – TA Trends (@timesapplaudtrends)

आणखी वाचा – Video : अंबानींनाही पडली पारंपरिक कोळीगीतांची भुरळ, रिसेप्शन सोहळ्यात घुमले मराठमोळे सुर, व्हिडीओ व्हायरल

मग आजी त्याला उचलत त्याच्याकडे माइक देते. नंतर तो ‘नमस्ते’ म्हणत पाहुण्यांचे स्वागत करतो आणि ‘जय श्री कृष्ण’ म्हणत निघून जातो. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पृथ्वीने आपल्या गोंडस कृतीने इंटरनेटवर सर्वांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेकजण लहानग्या पृथ्वीच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. नेटकरी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा – कुशल बद्रिकेच्या बायकोने बेडरुमभर वाळत घातले कपडे, मोठं घर घेतल्यानंतर अभिनेत्याने दाखवली परिस्थिती, म्हणाला, “वॉशिंग मशिनला…”

“काहीही असो, अंबानी कुटुंबात सनातनी संस्कृती दिसून येते”, “अंबानी कुटुंब खरोखरच त्यांच्या मुलांचे संगोपन खूप चांगले करत आहे”, “मुलाने जय श्री कृष्ण कोणीही न बोलता म्हटले, माणूस केवळ पैशाने नाही तर संस्कारांनी  मोठा होतो हे मला आवडले” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अनंत आणि राधिकाच्या लग्नात देशभरातील आणि जगभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अनंत-राधिकाच्या शाही विवाहानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशीर्वाद सोहळ्याला पोहोचून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

Tags: Nita and Mukesh Ambani grandsonNita and Mukesh Ambani grandson NewsNita and Mukesh Ambani grandson Viral Video News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prasad oak wife Manjiri Oak shared a her video on social media know more

Video : साडी नेसल्यावर खाली पडलेली वस्तू कशी उचलायची?, प्रसाद ओकच्या बायकोचा Funny Video चर्चेत, कलाकारांनाही हसू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.