असं म्हणतात कलेचं आदर करणं हे उत्तम कलाकाराचं लक्षण आहे त्याच प्रमाणे कलाकार किंवा त्याच्या विचारण्याचा आदर करणं देखील हे उत्तम कलाप्रेमीच लक्षण असू शकत. कलेकवर प्रेम करणारा माणूस हा कलाकाराच्या विचारांना महत्व देऊ शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे चतुरस्त्र अभिनेते स्वर्गीय निळू भाऊ फुले आणि धुरंधर राजकारणी स्वर्गीय विलासराव देशमुख.(Nilu Phule Vilasrao Deshmukh)
या दोघांमध्ये घडलेल्या एका पुरस्काराचा विषय निळू फघूले यांची मुलगी गार्गी ने शेअर केलं आहे. पुरस्कार म्हणलं कि हल्ली कलाकारांमध्ये देखील सकारात्मक स्पर्धा पाहायला मिळते.
गार्गी ने पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला. ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे. तुमची संमती हवी. निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही. मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे असे सुनावले. तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्च च्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे, असे भाऊंनी सीएमना आग्रहपूर्वक सांगितले. म्हणून २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला.(Nilu Phule Vilasrao Deshmukh)

पण निळू भाऊंनी पुरस्कार नाकारल्याचे कारण नक्की एखाद्या कलाकाराला प्रेरणा देणार ठरू शकत.