मराठी मनोरंजन सृष्टीतील लाडक्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं नाव नेहमीच घेतलं जातं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून तमाम रसिकांच्या मनात घर करणारी प्राजक्ता केवळ अभिनेत्री नसून, तर ती उत्तम नृत्यांगना, कवयित्री, सूत्रसंचालकदेखील आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका, सिनेमे व वेबसिरीज केल्या असून प्राजक्ता गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. शिवाय ‘रानबाझार’ वेबसिरीजमधील तिच्या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती.(Prajakta Mali)
सोशल मीडियावर सदैव सक्रिय राहणाऱ्या प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी ‘प्राजक्तराज’ नावाने मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड लाँच केला. त्याचे ब्रॅण्डिंग करण्याबरोबरच प्राजक्ता विविध प्रकारचे फोटोशूट करत असते. शिवाय ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटोज व व्हिडिओस शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. विशेष म्हणजे, तिच्या फोटोशूट्सची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगते. कधी तिच्या लूकचे कौतुक होते, तर कधी ट्रोल.
पहा प्राजक्ताचं हा फोटोशूट (Prajakta Mali latest photoshoot)

पुन्हा एकदा प्राजक्ता चर्चेत आलीये, ती एका फोटोशूटमुळे. ज्यात ती मराठमोळ्या साजमध्ये अगदी खुलून दिसतेय. बोरमाळ, कानातले, नथ, बांगड्या असे सुंदर दागिने, त्यात केसामध्ये लावलेला गुलाब आणि डोक्यावर घेतलेला पदर अश्या मनमोहक अंदाजात प्राजक्ता दिसतीये. हे फोटोस शेअर करताना प्राजक्ताने लिहिलंय, “उमगले रानाला, देठाला पानाला… माझ्या सरदाराला समजले ना…. अधीर मन झाले… मधूर घन आले…!”
प्राजक्ताचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं असून चाहते तिच्या पोस्टवर भरभरून लाईक्स व कमेंट्स करताना दिसतायत. एका नेटकऱ्याने तर “एक् दिवस मी हार्ट अटक नी मरनार् ❤️❤️????????” अशी मजेशीर कमेंट केली. तर एकाने “अशी बायको भेटायला कोणतं व्रत करावं लागत ????” असा प्रश्न केलाय.

याआधीही प्राजक्ताने अनेक फोटोशूट केलेली असून त्यांची चर्चा सोशल मीडियावर सतत होत असते. तिच्या फोटोशूट्सना कधी चाहत्यांचं प्रेम मिळतं, तर कधी तिला ट्रॉलिंगला सामोरं जावं लागतं.(Prajakta Mali latest photoshoot)
हे देखील वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले सोन्याच्या दागिन्यांचे महत्तव