लोकप्रिय टीव्ही शो रोडीज नव्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. या शोमध्ये धमाल, उत्साह आणि मारामारी पुन्हा पाहायला मिळणार आहे. अनेक वेळा स्पर्धक आणि खेळावरून संघात आणि संघमालकांत बाचाबाची होते किंवा कधी कधी मोठे वादही होतात. या सीझनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि नेहा धुपिया या दोघी पाहायला मिळणार असून त्यांच्यात वाद झाला आहे आणि हा वाद इतका वाढला की, नेहाने रियाला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. निवड प्रक्रियेदरम्यान सर्व काही ठीक चालले होते, परंतु रिया चक्रवर्ती आणि नेहा धुपिया यांच्यात मजामस्ती सुरु असताना रिया नेहासाठी एक शब्द वापरते, ज्यामुळे नेहाला वाईट वाटते. (Neha Dhupia and Rhea Chakraborty Fight)
एका टास्क दरम्यान हा सर्व प्रकार घडला. रियाने तिच्या बोलण्यात नेहाचा उल्लेख केला. एका एपिसोडदरम्यान त्याने नेहाला ‘बडी कामिनी है ये तू’ म्हटले. पण यावेळी नेहाने तिच्यावर रागावत ‘तुझा चेहरा पाहा’ असे म्हटले. मात्र, दोघांमधील संभाषणानंतर वातावरण चांगलेच तापले आणि दोघींमधील तणाव चांगलाच वाढला. यावेळी प्रेक्षकांबरोबर इतर ग्रुपचे सदस्यही पाहत राहिले. यानंतर नेहा म्हणाली की, जीभेवर नियंत्रण ठेवा. यावरुन रियाने जे नेहाला म्हटलं त्यावरून तिला ते आवडले नाही हे स्पष्ट दिसून आले. शो दरम्यान वादविवाद होण्याची ही काय पहिली वेळ नाही.
आणखी वाचा – चेक बाऊन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा दोषी, तीन महिन्यांची शिक्षा होणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सीझनमध्ये प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यात जोरदार भांडण व्हायचे. एवढेच नाही तर शोबाहेरील खऱ्या आयुष्यातही दोघांमधील भांडण खूप मोठे झाले होते. ‘रोडीज’ या शोबद्दल बोलायचे झाले तर, हा शो १५ वर्षांपासून सुरू आहे आणि रणविजय सिंहने या शोचे अधिक सीझन केले. मात्र, त्याने १७व्या सीझनमध्ये शो सोडला आणि त्याच्या जागी सोनू सूद आला.
आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर क्रिकेटचा खेळ, लीलाच्या सासूची दमदार बॅटिंग, व्हिडीओ समोर
अशातच ‘MTV Roadies 20’ हा नवीन शो पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यात प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती, नेहा धुपिया हे संघ मालक असतील. या शोमध्ये एल्विश यादव देखील संघमालकाच्या भूमिकेत येणार असल्याचे बोलले जात आहे.