कलाकार हा त्याच्या कलागुणांनी बहरत असतो तयच बहरन हे प्रेक्षकांना त्याच्या कलेकडे आकर्षित करत असत. मनोरंजन विश्वात असे असंख्य बहरलेली व्यक्तिमत्तव आहेत जी आज आपल्यात नसली तरी अभिनयानं कायम अमर आहेत. असाच अभिनित अमर कलाकारांच्या यादीत आज आणखी एक नाव दुर्दैवाने जोडलं गेलं ते म्हणजे अभिनेते, निर्माते सतीश कौशिक. एक अभिनेता किंवा दिगदर्शक, निर्माता म्हणून कौशिक प्रसिद्ध होतेच पण त्या पेक्षा ते एक माणूस जाणीव मित्र म्हणून हि चांगलेच प्रसिद्ध होते.(Satish Kaushik Neena Gupta)
मैत्रिणीसाठी सतीश यांनी उचललेलं मोठं पाऊल(Satish Kaushik Neena Gupta)
त्यांच्या या मैत्रीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इतर इंडस्ट्रीत हि काम करताना दाखवलेली आत्मीयता. नीना गुप्ता यांनी सतीश यांच्यासोबतच्या मैत्रीचं एक उत्तम उदाहरण त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की त्या गर्भवती असताना तिच्या पोटातील बाळाला ओळख देण्यास त्या व्यक्तीचा नकार होता तेव्हा त्यांना होणाऱ्या त्रासाला बघून होणाऱ्या बाळाला मी माझं नावं द्यायला तयार आहे अस म्हणत नीना यांना मैत्रीपूर्ण भावनेने मदत करण्यास सतीश कौशिक तयार झाले होते.
नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिला स्वतःच नाव देण्यास सतीश हे तयार झाले होते कारण त्यांना या परिस्थतीत नीना गुप्ता याना एकटं सोडायचं न्हवत. जर जन्म दिलेल्या बाळाला स्वीकारायला तयार झाले तर लोकांना सांग हे माझं मुलं आहे आणि मग आपण लग्न करू असं सतीश यांनी नीना यांना सांगितलं होत.

झगमगाट असलेल्या चंदेरी दुनियेत काही गोष्टी बाजूला ठेवून मैत्रीसाठी असा उभा राहणारा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हवा.(Satish Kaushik Neena Gupta)
=====
हे देखील वाचा – “तुझ्यातलं बाईपण आमच्या दोघीत झिरपत राहो…..”
=====
अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांचं कॅलेंडर हे पात्र विशेष गाजलं या सोबतच राम लखन, दिवाणा मस्ताना अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी हटके अंदाजात अभिनय सादर करत प्रेक्षकांची मन जिंकली.अभिनया सोबतच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन ही केले. रूप कि राणी चोरो का राजा, हमारा दिल आपके पास है, मुझे कूच केहना है, बधाइ हो बधाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिगदर्शन सतीश यांनी केले आहे. १९८३ पासून सुरु झालेला सतीश यांचा हा अभिनित प्रवास अखेर २०२३ मध्ये थांबला.