मनोरंजन विश्वात मालिकांचं पसरलेलं जाळं अफाट आहे तरीही प्रेक्षकांना या जाळयात गुरफटायला आवडत याच कारणं प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीही कसूर न ठेवणारा कलाकार. कलाकाराने कधीही पडद्यावर यावं आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंत करू नये हे फार कमी वेळा घडत. असच काहीस पुन्हा एकदा घडणार आहे. प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळापासून घर करून बसलेली अभिनेत्री निर्मिती सावंत आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. आता पर्यंत तुफान विवनोदी अभिनयाने तसेच निरनिराळ्या भूमिकांमधून निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विनोदाची महाराणी म्हणून सर्वत्र चर्चेत असणाऱ्या निर्मिती सावंत आता सन मराठी या आघाडीच्या वाहिनीवरील कन्यादान या लोकप्रिय मालिकेत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(Nirmiti Sawant New Serial)
सन मराठीवरील कन्यादान ही मालिका मागील एक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरून प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेत कलाकारांची तंगडी फौज आहे या फौजेत आता निर्मिती सावंत यांची एन्ट्री होऊन काय नवीन रंगत पाहायला मिळणार या साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेतील महाले कुटुंबात विनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
====
हे देखील वाचा- “सर्व भावनांचा कोलाज…” समीरची सचिन गोस्वामींसाठी खास पोस्ट
====
तर महाले कुटुंबात आता विंदू आत्याची एन्ट्री होणार आहे. अतिशय हुशार असणारी इंदू आत्या कोणतं कथानकात कोणतं नवीन वळण आणणार हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालाताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं माहित आहे. त्यामुळे, आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून, आशालाताने आपल्या तीनही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता अनेक वर्षानंतर आत्या महालेंच्या घरी येणारं आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबियांना अनुभवयाला मिळणार आहेत.(Nirmiti Sawant New Serial)
अनेक चित्रपट, विनोदी कार्यक्रम, नाटक यांच्या माध्यमातून आता पर्यंत निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. तर निर्मिती सावंत यांचं झिम्मा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला होता.