Navri Mile Hitlerla : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. लीला एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते आणि लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. लवकरच त्यांच्यातील प्रेम बहरातानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एजे व लीला यांचं अशा परिस्थितीत लग्न झालं होतं जिथे ते एकमेकांना अजिबात पसंत नव्हते. (Navri Mile Hitlerla Serial Update)
मात्र आता एजे व लीला यांचे नाते बहरतानाचे पाहायला मिळत असून नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमधून त्यांचं नात्यातील गोडवा पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला असून या नवीन प्रोमोमध्ये एजे लीलाची काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि एजेला लीलाची काळजी घेताना पाहून त्याची आईलादेखील आनंद झाला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये लीला आजारी असून तिच्या काळजीपोटी एजे सर्वात चांगल्या डॉक्टरांना तिला तपासण्यासाठी बोलावतो. त्यानंतर डॉक्टर येतात आणि लीला खूप दमली आहे आणि यामुळे तिला अशक्तपणा आला असल्याचे सांगते. ती पावसात भिजल्यामुळे तिला ताप आला आहे. पण यात काळजी करण्यासारखे काही नाही असं ते सांगतात. यापुढे तिला ताप आल्यामुळे तिने फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टर एजेला देतात.
आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने गवळण गाताच भर कार्यक्रमात उठून नाचू लागल्या आजी, ‘ते’ दृश्य पाहून बायकोही भारावली
एजे लीलाची काळजी घेत असल्याचे पाहून एजेंच्या आईलाही मोठा धक्काच बसतो आणि त्या दोघांसाठी खुश होतात. लीलाला फक्त ताप असला तरी एजे तिच्या काळजीपोटी त्रस्त झाल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ते तिच्या उशाशी बसून तिच्या डोक्यावर मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत आहेत. तसंच तिची सर्वतोपरी काळजीही घेत आहेत. त्यामुळे आता या दोघांमध्ये काळजीतून हळूहळू प्रेम बहरणार असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात डीपी पडला एकटा, ग्रुपमधील सदस्यांनाही धनंजय नकोसा, अंकिताला म्हणाला, “मला जाणवतं की…”
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट एजेची भूमिका साकारत आहे. तर वल्लरी लोंढे लीलाची भूमिका साकारत आहे. लीलाचे लग्न हे एजेशी होते. पण लग्न होईपर्यंत एजेला माहिती नसते की त्याचे लग्न श्वेता ऐवजी लीलाशी झाले आहे.