Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण ‘टीम ए’मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या ‘टीम ए’मधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. या घरात निक्की व वाद हे समीकरण काही नवीन राहिलेलं नाही. या घरातील भांडणासाठी निक्कीचे नाव कायमच अग्रेसर असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. अशातच ती एक नवीन वाद उकरून काढणार आहे आणि या वादाचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या नवीन प्रोमोमध्ये निक्की तिच्या बेडवर पडलेल्या टिश्यू पेपरवरुन नवीन वाद करणार आहे. बिग बॉसच्या कालच्या भागात आर्या व अरबाज या दोघांनी मिळून निक्कीवर सुड काढण्यासाठी निक्की वॉशरुमला गेली असताना तिच्या बेडवर टिश्यूचे तुकडे अस्ताव्यस्त फेकले होते आणि यावरुनच आता निक्की वाद करणार आहे. या नवीन प्रोमोमध्ये सदस्यांमध्ये या टिश्यूवरुन बाचाबाची होतानाची पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : एजे लीलाच्या प्रेमात, आजारी असताना रात्रभर उशाशी बसला अन्…; नातं फुलणार
नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्की असं म्हणते की, “आम्ही टिश्यू जसे होते तसंच ठेवणार” यावर अरबाज असं म्हणतो की, “तिने जर पडलेले टिश्यू पेपर उचलले तर तिला कमीपणा वाटणार आहे का?” यावर अभिजीत असं म्हणतो की, “एकमेकांच्या कुरघोड्या करु नका”. यापुढे धनंजय अभिजीतला मध्येच टोकत असं म्हणतो की, “आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही”. तसंच यापुढे डीपी अभिजीतला “तुला असं वाटतं नाही का निक्की चुकत आहे” असा प्रश्नही विचारतात.
आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने गवळण गाताच भर कार्यक्रमात उठून नाचू लागल्या आजी, ‘ते’ दृश्य पाहून बायकोही भारावली
यापुढे अभिजीत असं म्हणतो की, “जे चुकत आहेत त्यांनी स्वत: काय ते समजावं”. या संवादात काहीतरी झाल्यामुळे निक्की उठून जाते आणि जाता जाता ती असं म्हणते की, “इतकंच कुणाला काही वाटत असेल तर स्वत:ची कामे स्वत: करा”. त्यामुळे आता या टिश्यूमुळे घरात कोणता नवीन इश्यू होणार आहे? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच घरात नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार असून या टास्कमध्ये या घराला कोण नवीन कॅप्टन मिळणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.