रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : एजेंकडून लीलाचा गृहलक्ष्मी म्हणून स्वीकार, सगळ्यांसमोर मंगळसूत्रही घातलं, नात्याला नवं वळण  

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 6, 2024 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial updates new promo AJ accepted Leela as his wife see the details

Navri Mile Hitlerla मालिकेत एजेंकडून लीलाचा गृहलक्ष्मी म्हणून स्वीकार, नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीलाने जहागीरदारांचे घर सोडले. लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली होती. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून यावेळे एजेंनी तिला या घरात नीट वागायचे नसेल तर घर सोडून जा असं म्हटलं. यावर लीलाने घर सोडले. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

त्यानंतर लीलाची मनधरणी करण्यासाठी एजेंची आई पुढे आली. लीलाची समजूत काढत त्याच्या आईने असं म्हटलं की, “एजे आधी खूप डॅशिंग होता. त्याच्या या डॅशिंगपणावरच अंतरा भाळली. पण ती निघून गेल्यावर त्याने स्वत:ला इतरांपासून दूर केलं. या सगळ्यातून एजेला तूच बाहेर आणू शकतेस. तू त्याला असं वाऱ्यावर सोडू नकोस”. त्यामुळे एजेंच्या प्रेमात असलेली लीला एजेंच्या आईला मी घरी येईन असं म्हणते आणि घरात येते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे विकी कौशलला भिती, ‘छावा’ चित्रपटाची माघार, प्रदर्शन पुढे ढकलले

एजे व लीला यांचे लग्न झाले असले तरी एजेंनी अजून लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. मात्र नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये एजे लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत तिचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे. जहागीरदारांच्या घरात दिवाळीच्या पूजेनिमित्त  सगळे जमलेले असतात. पण या पूजेला लीला नसते. तेव्हा एजे तिच्याबद्दल आईला विचारतात. त्यांतर एजे स्वत: लीलाला बोलवण्यासाठी जातात. तेव्हा लीला आपल्या मनातील खंत एजेंना बोलून दाखवते. मालिकेच्या आगामी भागाचा हा नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला असून हा प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – दोन वर्षांची झाली आलिया-रणबीर यांची लेक, बॉलिवूडकडून सेलिब्रेशन, Unseen Photos व्हायरल

एजे लीलाला बोलवण्यासाठी जातात आणि तिला म्हणतात की “घरात दिवाळी असताना तू अंधार करुन का बसली आहेस?” असं म्हणतात. यावर लीला असं म्हणते की “मला ना बायको होण्याचा अधिकार आहे ना सासू होण्याचा हक्क… मग मी कुठल्या तोंडाने पूजेला बसू”. यावर एजे लीलाला घेऊन येतात आणि सर्वांसमक्ष तिच्या हातातील मंगळसूत्र काढून गळ्यात घालतात. त्यामुळे आता एजेंनी लीलाला गृहलक्ष्मीचा मान दिल्यानंतर आता त्यांच्या नात्यात काय य बदल होणार?  हे आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Tags: Marathi Serial NewsNavri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Rahul Vaidya New Home

राहुल वैद्यने वांद्रेमध्ये खरेदी केलं आलिशान घर, इतका केला खर्च, दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली कोट्यवधींची कार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.