शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : एजेंना तुरुंगात टाकण्याचा श्वेताचा जाणीवपूर्वक प्रयत्न, लीला नवऱ्याला निर्दोष सिद्ध करु शकेल का?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 13, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Serial Updates Leela finding way to rescue aj from the jail

नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीला एजेंची सुटका करण्यात लीलाला यश मिळणार का?

Navri Mile Hitlerla Serial : झी मराठी वाहिनीवरील लीला आणि एजे यांची हटके कथा असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सगळं काही नीट चालेलेलं असताना आणि एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच एजेंवर मोठं संकट आलं आणि हे संकट म्हणजे एजेंची अटक. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यासाठी आणि ती आनंदात कशी राहील यासाठी प्रयत्न करण्याचं वचन मागते. इकडे श्वेता एजेंसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते. ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. ती रुग्णालयात जाऊन श्वेताला भेटते आणि सरोजिनीच्या मदतीने श्वेताशी डील करण्याचा प्रयत्न करते. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमधून लीला एजेला बाहेर काढणार असल्याचे म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अंध चाहतीने गायलं गाणं, उत्कर्ष शिंदेने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “माइकला हात लावताच…”

या नवीन प्रोमोमध्ये लीला एजेला भेटण्यासाठी तुरुंगात जाते. यावेळी ती “माझा नवरा निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमची काहीही चूक नाही आणि मी काहीही करुन तुला यातून बाहेर काढणार”. यानंतर एजेला तिचं त्यांच्यावर प्रेम असल्याचे सांगते. यावेळी ती “मी तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे मला पण तुमची काळजी आहे” असं म्हणते. आजचा दिवस तुम्ही जेलमध्ये काढा मी तुम्हाला उद्या बाहेर काढेन” असं म्हणते. लीला लीला श्वेताला जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते. त्यानंतर श्वेता आम्ही हे फक्त एजेंना अटकवण्यासाठी करत असल्याचे लीलाला म्हणते.

आणखी वाचा – अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?

दरम्यान, श्वेताच्या या जाळ्यातून एजे कसं सुटणार? त्यांना वाचवण्यात लीलाला यश मिळेल का? श्वेताचा हा डाव तिच्यावरच उलटणार का? लीला एजेंची निर्दोष मुक्तता करु शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Tags: Marathi Serial NewsMarathi Serial UpdatesNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Rashmi Desai Casting Couch

"मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करुन त्याने…", 'बिग बॉस' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "काही तासांतच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.