‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेत आहेत. पण आता दुर्गा त्याला विरोध करते. दुर्गा, लीलावर यशच्या आयुष्याशी खेळ केल्याचा आरोप करते. लीला इथे पाहिली तर मी हे घर सोडून जाईन, असं ती ठामपणे सांगते. यानंतर मतदान होते आणि यामुळे तिला घराबहेर जावे लागते. अशातच आता मालिकेत नवीन वळण आलं आहे आणि या नवीन वळणाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. (navri mile hitlerla serial update)
मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे लीलाच्या आयुष्यात पुढे काय होणार, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, लीला व एजे कारमधून जात आहेत. त्यावेळी आजीचा लीलाला फोन येतो. या नवीन प्रोमोमधून एजे लीलाच्या बाजूने पुन्हा मतदान करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या प्रोमोमध्ये आजी लीला सांगते, “प्रमोद व विराजच्या पाठीशी उभी राहिलीस, त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलं आहे”.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण…; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन
त्यानंतर लीला एजेला म्हणते, “का? तुम्ही या सगळ्यातून जायला लावत आहात? आणि आज असं वेगळं काय होणार आहे? आजी मला वोट करतील. कदाचित प्रमोदसर आणि विराजसर मला वोट करतील. पण, लक्ष्मी, सरस्वती व किशोरसर दुर्गालाच वोट करणार आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबणार. तुम्ही त्या दिवशी कोणाला मत दिलं होतं हेही मला माहीत नाही.” हे ती बोलत असताना जहागीरदार कुटुंबातले सदस्य वोटिंग करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘आठवी-अ’ व ‘पाऊस’च्या भरघोस यशानंतर लवकरच नवी वेबसीरिज येणार, मुहूर्त सोहळा संपन्न,
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने, “एजेंनी कुणाला वोट दिलं, हे कळेल का लीलाला?”, असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता या वोटिंगमध्ये एजे नक्की कुणाला मत देणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसंच लीलाने नुकतंच ऑफिसमधील फ्रॉड उघड केल्याने तिच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.