Navri Mile Hitlerla Serial : झी मराठीवरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका. एजे व लीला यांच्यामधील मैत्री, त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तसेच संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकातीळ अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. (Navri Mile Hitlerla Serial Update)
अशातच आता मालिकेत एक अनपेक्षित वळण आले आहे. ते म्हणजे लीलाने जहागीरदारांचे घर सोडले. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली होती. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून यावेळे एजेंनी तिला या घरात नीट वागायचे नसेल तर घर सोडून जा असं म्हटलं. “तुला जर या घरात अंतराची जागा न घेता फक्त लीला म्हणून राहायचे असेल तरच राहा. नाहीतर इथून जा” असं एजेने लीलाला सांगितले.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : गंभीर आजाराचा अमोलला पुन्हा त्रास, अप्पी-अर्जुनला त्याच्या आजारपणाविषयी कळणार का?
अशातच आता घर सोडून गेलेल्या लीलाची मनधरणी करण्यासाठी एजेंची आई पुढे आली आहे. याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यात एजेंची आई लीलाला एजेचा भूतकाळ सांगते, याबद्दल ती असं म्हणते की, “एजे आधी खूप डॅशिंग होता. त्याच्या या डॅशिंगपणावरच अंतरा भाळली. पण ती निघून गेल्यावर त्याने स्वत:ला इतरांपासून दूर केलं. स्वत:ला शिक्षा करुन घेतल्यासारखं तो वागत असतो. त्यामुळे लीला हे तू थांबव”.
यापुढे एजेंची आई लीलाला असं म्हणतात की, “या सगळ्यातून एजेला तूच बाहेर आणू शकतेस. तू त्याला असं वाऱ्यावर सोडू नकोस”. त्यामुळे एजेंच्या प्रेमात असलेली लीला एजेंच्या आईला मी घरी येईन असं म्हणते. त्यामुळे आता लीला व एजे यांच्या नात्यात काय बदल होणार? लीला एजेंना पुन्हा पहिल्यासारखं डॅशिंग करणार का? त्याला अंतराला विसरता येणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.