बुधवार, मे 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एजेंनी पत्नी म्हणून स्वीकार करावा यासाठी लीलाने मान्य केल्या सगळ्या अटी, पुन्हा घरात आल्यानंतर गैरसमज दूर होणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Promo

एजेंनी पत्नी म्हणून स्वीकार करावा यासाठी लीलाने मान्य केल्या सगळ्या अटी, पुन्हा घरात आल्यानंतर गैरसमज दूर होणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. लीला व एजे यांचं लग्न झाल्यापासून जहांगीरदारांचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे. लीला घरात आल्यापासून एजे-लीलाची जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळाली. रेवतीला किडनॅप केल्याने लीलावर एजेंशी लग्न करण्याची वेळ आहे. किडनॅपरने दिलेल्या धमकीमुळे एजे व लीलाचा लग्नसोहळा पार पडला. (Navri Mile Hitlerla Promo)

तर इकडे लग्न होऊनही एजेंनी लीलाचा बायको म्हणून स्वीकार केलेला नाही. त्यामुळे एजे व लीला एकत्रही आलेले नाहीत. दरम्यान आजींच्या आग्रहाखातर लीला एजेंच्या रूममध्ये राहायला तयार झाली आहे. मात्र एजेंनाही हे काही पटलेलं नाही. मात्र आईचा शब्द मोडणार कसा म्हणून ते लीलाला सहन करत आहेत. दोघेही एकत्र राहत असतात. तेव्हा लीला कपाट लावत असताना तिला किडनॅपर घातलेला मास्क दिसतो. तो मास्क पाहून लीलाचा खूप मोठा गैरसमज होतो.

आणखी वाचा – “दुसऱ्या धर्मात लग्न करण्याची पहिलीच वेळ नाही”, लेकीच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांचं उत्तर, म्हणाले, “झहीर तिला…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

लीलाला असं वाटत की, हा मास्क एजेंच्या कपाटात आहे म्हणजे रेवतीला एजेंनी पळवलं होतं. माझ्याशी लग्न करायला एजेंनी एवढा मोठा डाव आखला. लीला हे प्रकरण सर्वांसमोर आणते. आणि या घरात एकही क्षण राहायचं नाही असं म्हणून घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. एजे लीलाला समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र लीला कोणाचंच ऐकून घेत नाही. तेव्हा आजीही लीलाला समजावते आणि घर सोडून जाऊ नको असं सांगते. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घर सोडून जाईन अशी धमकी दिलेली लीला पुन्हा घरात परतलेली दिसत आहे. आणि सोफ्यावर बसून ती सगळ्यांना बोलवायचे आदेश देते.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर बहीण-भावाच्या नात्यात फूट, भाऊ लव सिन्हाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री नाही, नक्की प्रकरण काय?

यावर एजे लीलाला विचारतात तू इथे काय करत आहेस. यावर एजे सांगते की, “मी या घरातून कुठेही जाणार नाही”. हे ऐकून एजे लीलाला बोलतात, “मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी सात अशक्य अटी घातल्या होत्या. त्या तुला पाळाव्या लागतील”. हे ऐकून लीला सर्व अटी मान्य असल्याचं सांगते. आता नव्याने सुरु झालेलं एजे व लीलामधील हे युद्ध कोणत्या पातळीला जाणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialNavri Mile HitlerlaNavri Mile Hitlerla Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dipika Kakar news
Entertainment

कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा’बद्दल सांगत म्हणाली, “हेल्दी फूड…”

मे 19, 2026 | 9:58 am
Cup Bashi Movie Teaser
Entertainment

नवऱ्याची नाहीतर सासूची पत्रिका जुळली पाहिजे; सूनेची अट पडणार का भारी?, ‘कपबशी’ चित्रपटाच्या टिझरने वाढवली उत्सुकता

मे 18, 2026 | 1:00 pm
K Rajan Passes Away
Entertainment

८५ वर्षीय सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची आत्महत्या, थेट नदीत उडी मारली आणि…; चित्रपटसृष्टीही हादरली

मे 18, 2026 | 11:00 am
Parag tyagi on shefali death
Entertainment

काळ्या जादूने शेफाली जरीवालाचा मृत्यू?, पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, ” खूप विचित्र आणि…”

मे 18, 2026 | 9:43 am
Next Post
11 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व सिंह राशींच्या लोकांना गुरुवारी मिळणार आनंदवार्ता, कुणाला नोकरीत नफा तर कुणाला व्यवसायात, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.