बुधवार, मे 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्तनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “माझ्या शरीरामध्ये…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sameera reddy

"स्तनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला अन्…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "माझ्या शरीरामध्ये…"

‘रेस’ सारख्या चित्रपटात अभिनेत्री समीरा रेड्डीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. ही अभिनेत्री आता तिच्या खऱ्या आयुष्यात खूप एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही समीरा खूप सक्रिय असते आणि प्रत्येक मुद्द्यावर ती मनमोकळेपणाने भाष्यही करते. अभिनेत्रीला बरेचदा बॉडी शेमिंगमुळे ट्रोल केलं गेलं. तर कधी लठ्ठ म्हटले गेले आहे मात्र हे सत्य समीराने स्वीकारले आहे. पण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, तिला एक वेगळाच धक्कादायक अनुभव आला. हा अनुभव समीराने ‘हिंदुस्तान टाइम्स’वर शेअर केला आहे. (sameera reddy)

अभिनेत्रीने सांगितले की, ती करिअरच्या शिखरावर असताना लोक तिच्यावर स्तनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव टाकत होते. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “माझ्या करिअरच्या शिखरावर असताना नोकरी मिळवण्यासाठी माझ्यावर स्तनाची शस्त्रक्रिया करण्याचा दबाव होता. समीरा सगळेच करतात, तू का नाही? पण मला माझ्या आत असं काही करायचं नव्हतं. आपण काहीतरी चुकीचे लपवत आहोत असे मला वाटत होते. आयुष्य जसे आहे तसे स्वीकारावे. प्लॅस्टिक सर्जरी व बोटॉक्स करवून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना माझा विरोध नाही, पण माझ्यासाठी काय योग्य आहे ते मला माहित आहे”.

आणखी वाचा – आदित्यची तब्येत खालावली, पारूचा किर्लोस्कर बंगल्यावर येण्यास नकार, अहिल्यादेवींनी तिच्या समोरच लेकाला वाचवण्यासाठी पदर पसरला अन्…

View this post on Instagram

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

समीराने पुढे सांगितले की, लोक तिला आता तिच्या त्वचेमुळे अधिक आनंदी व आरामदायी दिसत असल्याचं सांगतात. अभिनेत्रीने सांगितले की, ती २८व्या वर्षी सुंदर दिसत होती. पण वयाच्या ४५व्या वर्षी ती आनंदी व आरामदायी वाटत आहे. समीराने पुढे सांगितले की, जेव्हा ती ४० वर्षांची होती, तेव्हा तिचे वय इंटरनेटवर ३८ दाखवण्यात आले होते.

आणखी वाचा – हिंदी वेबसीरिजमध्ये ऋता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केला टीझर, हिंदीतील बड्या कलाकारांबरोबर करणार काम

समीराने असेही सांगितले की, जेव्हा तिने मीडियाच्या जगात प्रवेश केला तेव्हा तिला फिल्टर वापरण्यास सांगितले होते. परंतु अभिनेत्रीने स्पष्ट केले की, ती फक्त तिची खरी त्वचा दाखवेल. हीच तिची खरी ओळख आहे, ज्यासाठी ती आभारी आहे. ३६-२४-३६ फिगरमुळे तिला तिच्या मूळ रुपात राहायला आवडेल.
चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर समीरा आपल्या दोन मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे.

Tags: bollywood actresssameera reddysameera reddy said she was pressurisedsameera reddy stetement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dipika Kakar news
Entertainment

कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा’बद्दल सांगत म्हणाली, “हेल्दी फूड…”

मे 19, 2026 | 9:58 am
Cup Bashi Movie Teaser
Entertainment

नवऱ्याची नाहीतर सासूची पत्रिका जुळली पाहिजे; सूनेची अट पडणार का भारी?, ‘कपबशी’ चित्रपटाच्या टिझरने वाढवली उत्सुकता

मे 18, 2026 | 1:00 pm
K Rajan Passes Away
Entertainment

८५ वर्षीय सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची आत्महत्या, थेट नदीत उडी मारली आणि…; चित्रपटसृष्टीही हादरली

मे 18, 2026 | 11:00 am
Parag tyagi on shefali death
Entertainment

काळ्या जादूने शेफाली जरीवालाचा मृत्यू?, पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, ” खूप विचित्र आणि…”

मे 18, 2026 | 9:43 am
Next Post
11 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

राजयोगामुळे मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे अगदीच खास, काय असणार तुमच्या नशिबात?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.