झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकताच मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. श्वेताऐवजी एजेचे लग्न हे लीलाबरोबर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मालिकेतील हा ट्विस्ट मालिकेच्या चाहत्यांना आवडला असला तरी एजेच्या सूनांना ही गोष्ट काही पटलेली नाही. एजेलादेखील श्वेताऐवजी त्याचे लीलाबरोबर लग्न झालेले पटलेले नाही. याबद्दल एजेने लीलावर राग व्यक्त केला होता. तसेच लीलाने एजेचा विश्वासघात केल्याचेही त्याने म्हटले होते.
यानंतर लीलाने जहागीरदारांच्या घरात सून म्हणून प्रवेश केला. मात्र ही गोष्ट एजेंच्या सूनांना पटली नाही. त्यानंतर एजेंची आई सरोजिनी जहागीरदार लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. घरातल्या कुणालाच काहीच न सांगता त्या लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. त्यामुळे सर्वजण चिंतेत पडले असून एजे आईला फोन करतात. तेव्हा एजेंच्या आई असं म्हणतात की, “अभिराम जशा तूला तुझ्या सूना महत्त्वाच्या आहेत. तशी माझी सूनही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता घरी येईन तर माझ्या सूनेला सोबत घेऊनच येईन”. कथानकातील हा नवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलाच आवडला.
अशातच या कथानकात आणखी एका नवीन ट्विस्टची भर पडली असून या नवीन ट्विस्टबद्दलचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा नवीन प्रोमो कथानकातील पुढील ट्विस्ट निर्माण करत आहे. या नवीन प्रोमोमध्ये एजे आपल्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असून त्यांची आई त्यांना व लीला मानाने घेऊन् जाण्याचे सांगतात. यापुढे ते लीलाला तुझ्यासारख्या फसव्या मुलीला मी माझ्याबरोबर कधीच घेऊन् गेलो नसतो पण आईसाठी मला हे करावं लागत असल्याचे तो म्हणतो.
एजे लग्नानंतर पहिल्यांदाच लीलाच्या घरी आल्याने तिचे वडील एजेला काही रितीभाती पूर्ण करण्याबद्दल सांगतात. पुढे लीलाची एजेंना कंकण सोडवण्याच्या विधी करण्याविषयीही सुचवते. त्यामुळे आता एजे लीलाबरोबरच्या कंकण विधीसाठी तयार होणार का? तसेच लीला पुन्हा एजेंबरोबर जहागीरदारांच्या घरात जाणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.