शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navra Maza Navsacha 2 Teaser : विनोदी डायलॉगबाजी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’चा टिझर प्रदर्शित, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांची लक्षवेधी झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 15, 2024 | 12:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navra Maza Navsacha 2 teaser

'नवरा माझा नवसाचा २’च्या टिझरने नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरुवात, लक्षवेधी सीन आणि...

सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ५ फेब्रुवारीला सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली अगदी तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहेत. सध्या चित्रपटांचे सिक्वेल मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. अशातच नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वलही तब्बल १९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला दिसत आहे. येत्या २० सप्टेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धमाकूळ घालायला सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर समोर आला आहे. (Navra Maza Navsacha 2 teaser)

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षकवर्ग पाहतो. चित्रपटातील गाणी, डायलॉग, भूमिका यांवर मराठी रसिक प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतो. अशातच आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट येणार असल्याचं कळताच प्रेक्षकांचा एक वेगळाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता हा प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करायला चित्रपटाचा टिझर समोर आला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझं तोंड बंद कर…”, डीपी व आर्यामध्ये भांडण, वादाला तोंड फुटणार, म्हणाली, “तुमचं ऐकायला…”

View this post on Instagram

A post shared by Navra Maza Navsacha 2 (@navra_maza_navsacha_2)

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात आपण एसटीचा प्रवास अनुभवला मात्र, आता या प्रवासात ट्विस्ट असणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा भाग २’ मध्ये कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. तर, अशोक सराफ यावेळी बस कंडक्टर नव्हे तर टीसी म्हणून पेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये कोकण रेल्वेने सुरु झालेला हा गणपती पुळे पर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. सरकारी तिजोरीतून हरवलेले हिरे, ते दोन चोर, हरवलेली मूर्ती आणि कोकण रेल्वेतून रत्नागिरी पर्यंतचा प्रवास याभोवती फिरणार विनोदी कथानक टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने समोर आणली ‘बिग बॉस मराठी’ शोची खरी बाजू, म्हणाली, “घाणेरडी बाजू…”

अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हेमल इंगळे, विजय पाटकर ही कलाकार मंडळी त्यांच्या विनोदी अंगाने चित्रपटात धुडगुड घालणार असल्याचं दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज होत आहे.

Tags: marathi movieNavra Maza Navsacha 2Navra Maza Navsacha 2 teaser
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 suraj chavan lovestory

Bigg Boss Marathi : प्रेमात मिळाला मोठा धोका, गोलीगत सूरजने पहिल्यांदाच सांगितली प्रेमकहाणी, म्हणाला, "गोरापान मुलगा आवडला तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.