सध्या सोशल मीडियावर गदर २ चित्रपटाची चांगलीच हवा आहे. सनी देओलच्या गदर २ च्या टीझरने सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ तयार केली आहे. या चित्रपटातील उड जा काले कावा हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होतं आहे. अशातच या चित्रपटातील आणखी एक गुपित समोर आलं आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असताना आता या चित्रपटात स्टार कास्टमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील सामिल झाले आहेत.(Nana Patekar in Gadar 2)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात कोणत्या भुमिकेत असणार असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. तर नाना पाटेकर या चित्रपटात अभिनय करताना दिसणार नसून ते एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर यांची शारीरिक उपस्थिती नसून ते व्हॉइस ओव्हर देणार आहेत. तरण आदर्श यांनी एक फोटो शेअर केला असून यांत नाना पाटेकर हे व्हॉइस ओव्हर देताना दिसत आहेत.
पाहा गदर २ मध्ये या भूमिकेतून येणार नाना समोर (Nana Patekar in Gadar 2)
“नाना पाटेकर यांनी ‘गदर 2’ साठी व्हॉईस ओव्हर केला आहे. नाना पाटेकरांनी ‘गदर 2’साठी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नानाचा आवाज असणार..ते प्रेक्षकांना गदर 2 ची ओळख करून देईन.” असं कॅप्शन देत त्यांनी नाना पाटेकर यांच्या भुमिकेबद्दल खुलासा केला आहे.(Nana Patekar in Gadar 2)
हे देखील वाचा – मी प्रथमेशला ‘दादा’ म्हणायची; मुग्धाचा खुलासा
२००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलच धुमाकूळ घातला होता. तेव्हा या चित्रपटाला अभिनेते ओम पुरी यांनी आवाज दिला होता. आता गदर च्या सिक्वेलला अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार आवाजाने बहारदार करणार आहेत.
