महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी शो सर्वच प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतो.या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला.या कार्यक्रमातील काही कलाकार हे पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेतदेखील झळकतात.पोस्ट ऑफिस उघड आहे ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली. तर आता या मालिकेने नवा ट्रेंड सुरु केला आहे.(Namrata Sambherao 90’s Photo)

“पोस्ट ऑफिस उघडं आहे” च्या कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला त्यांचे ९० दिच्या काळातले फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शन मध्ये कलाकार म्हणतायत ”पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. असं म्हटलंय. नम्रता संभेराव हिने इंस्टाग्रामवर तिचे ९० च्या काळातील काही फोटो शेअर केलेत.यात काही फोटोत फ्रॉक आणि काही फोटोत ती साडीत पाहायला मिळते.हे फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. हे फोटो चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी या फोटोवर भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. तिचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिची तुलना विराट कोहलीशी करत तिच्या फोटोवर विराट कोहली अशी कॉमेंट केली आहे. तर काहींनी तिला छोटी लॉली, why do you look like ओंकार भोजने? असं म्हटलंय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.यासोबतच या मालिकेतील जवळपास सर्वच कलाकारांनी त्यांचे ९० च्या काळातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांच्या या फोटोना चाहत्यांची पसंती मिळते.(Namrata Sambherao 90’s Photo)

हे देखील वाचा- ‘जिस देस मे गंगा रहता है’ मांजरेकरांनी दादांच्या ‘एकटा जीव सदाशिव’चा रिमके करण्याचा घाट घातला खरा पण….
हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या ”वेट क्लाउड प्रोडक्शन” च्या मार्फत “पोस्ट ऑफिस उघड आहे” ही मालिका तयार झाली. ९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. हा जादूही काळ पुन्हा अनुभवता यावा आणि नवीन पिढीला त्या काळाची ओळख पटावी या हेतूने पोस्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका ५ जानेवारीपासून सुरू झाली होती. आणि या मालिकेला चाहहत्यांची चांगली पसंती मिळालीय. पण आता या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.
