सध्या मनोरंजन विश्वातील एक जोडी सर्वत्र चांगलीच चर्चेत आहे. चर्चेत असलेली ही जोडी म्हणजे सुप्रसिद्ध दाक्षिण्यात अभिनेता नागा चैतन्य व अभिनेत्री शोभिता धुलापिया. काही दिवसांपूर्वी नागा चैतन्य व शोभिताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोंवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव करत नागा चैतन्य व शोभिताच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या पाहायला मिळाल्या. आता पुन्हा एकदा ही जोडी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. दाक्षिण्यात अभिनेत्री सामंथा व नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य व शोभिता लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं परंतु पुन्हा एकदा नागा चैतन्यच्या आयुष्यातून त्याची बायको निघून जाणार असं एक भाकीत सर्वत्र व्हायरल झालं. (astrologer venu swamy about naga chaitanya)
एका ज्योतिष्याने भविष्यवाणी करत असं सांगितलं आहे कि “नागा चैतन्य व शोभिता हे २०२७ साली वेगळे होणार असून याचं कारण नागा चैतन्यच्या आयुष्यात येणारी नवीन मुलगी ठरेल”. आता या घटनेवरुन नागा चैतन्य व शोभिताचे चाहते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वेणू स्वामी हे भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषाचे नाव असून काही दिवसांपूर्वी याने एक व्हिडीओ पोस्ट करत ही भविष्यवाणी केली होती. या विरोधात एका पत्रकार संघाने पोलिसात तक्रार करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली . नागा चैतन्य व शोभिता धुलापिया यांच्या बद्दल असलेलं हे भाकीत हे भ्रमित करणारं आहे असं देखील या पत्रकार संघाकडून सांगण्यात आले आहे.

भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषाने मागितली माफी
पोलिसांच्या कारवाई नंतर नागा चैतन्य व शोभिता यांच्या बद्दल भविष्यवाणी करणाऱ्या वेणू स्वामी याने माफी मागत स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या कबुली जबाबात तो म्हणाला, ” नागा चैतन्य व शोभिता धुलापिया यांच्या बद्दल मी केलेलं ही भाकीत नागा चैनत्य व त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी समंथा यांच्या नात्यावरून केलेलं होतं”. (astrologer venu swamy about naga chaitanya)
नागा चैतन्य- शोभा धुलापिया यांच्या साखरपुड्याचे फोटो अनेक कलाकारांकडून देखील शेअर करण्यात आले होते. दाक्षिण्यात चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते व नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी देखील साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट करत सुनबाईंचे कौतुक केले आहे. या फोटोंना ” माझा मुलगा नागा चैतन्य व शोभा धुलापिया यांचं अभिनंदन. या दोघांच्या साखरपुड्यामुळे मी खूप आनंदी आहे. या नवं दाम्पत्यांना माझ्या खूप शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद.