शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुसलमानांनी हिजाब व सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करु नये”, नसीरुद्दीन शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुसलमानांच्या मनात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2024 | 3:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
naseeruddin shah on pm narendra modi

"मुसलमानांनी हिजाब व सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करु नये", नसीरुद्दीन शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, "मुसलमानांच्या मनात…"

बॉलीवुड अभिनेता नसीरुद्दीन शाह हे मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. याबरोबरच त्यांनी नाटकांमध्येही काम केले आहे. मात्र ते अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यातील घटनांवरही ते नेहमी व्यक्त होत असतात. अनेकदा ते देशातील, समाजातील विषयांवर आपले परखड मत मांडत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या नवीन विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये देशातील मुसलमान ते देशाचे पंतप्रधान यांच्याबद्दल भाष्य केले आहे. याबद्दल आता चर्चा सर्वत्र होत आहे. (naseeruddin shah on pm narendra modi)

नसीरुद्दीन हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. अशातच त्यांनी आता नरेंद्र मोदी व देशातील मुसलमान यांच्याबद्दल भाष्य करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी देशातील मुसलमानांच्या हिजाब व सानिया मिर्झाच्या स्कर्टबद्दल विचार मांडण्याऐवजी शिक्षणासंबंधित चर्चांवर अधिक भर द्यावा.  त्यांनी मुलाखतीमध्ये म्हंटले की, “एखाद्या दिवशी पंतप्रधानांना इस्लामिक टोपी घातलेली बघायला आवडेल. यामुळे देशातील मुसलमानांच्या मनात असलेला मोदींबद्दलचा गैरसमज दूर होईल. नरेंद्र मोदी यांच्या मनात मुसलमानांबद्दल कोणताही राग नाही”.

आणखी वाचा – मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हावर वडील व भाऊ नाराज?, शत्रुघ्न सिन्हांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ

View this post on Instagram

A post shared by Naseeruddin Shah (@naseeruddin49)

पुढे ते म्हणाले की, “जर मोदी यांनी मुसलमानांना राजी करु शकले तर याचा त्यांना केला. गेल्या काही वर्षांपासून मोदी कमी समजूतदारपणा दाखवला आहे. ते स्वतःला देव मानत आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच सावध राहा. ते आता आयुष्यभर प्रधानमंत्री राहतील असे मोदींना वाटले होते. मात्र त्यांनी आता सत्ता सोडावी. त्यांच्यासाठी हे कठीण असेल”.

आणखी वाचा – “आनंदी पुन्हा ये”, ‘मन धागा धागा’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “आनंदी-सार्थकची जोडी…”

त्यानंतर ते म्हणाले की, “जेव्हा भाजपाने बहुमत गमावले तेव्हा त्यांना समजले की गेल्या १० वर्षांपेक्षा त्यांची सध्याची स्थिती खूप खराब आहे. तेव्हा त्याबद्दल आनंद व्यक्त करावासा वाटला”. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, मोदींसाठी आता झालेला बदल ते स्वीकारतील का?, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “हे पंतप्रधानांसाठी खूप कठीण होऊ शकते. ते इतके चांगले अभिनयदेखील करत नाहीत. त्यांचे हास्य व खोटे अश्रु या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. ते नवीन मोदी होण्याचा अभिनय करु शकत नाहीत”.

तसेच त्यांनी सांगितले की, “मुसलमानांच्या मदरश्यांऐवजी शिक्षण व नवीन विचारांवर चर्चा व्हावी. मोदींचा विरोध करणे खूप सोपे आहे. खरं तर हे आहे की मोदी येण्याच्या आधीही देशात खूप काही चुकीचं होत होतं. आपल्या देशात पहिल्यापासूनच धर्मामध्ये खूप तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे”.      

दरम्यान नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Tags: musalmanmuslimnasiruddin shahpm narendra modiSania Mirza
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Zee Marathi channel netizens commented Bhatji is common who arranges marriage in all the serials

झी मराठीच्या मालिकांमधील लग्नात एकच भटजी, प्रेक्षकांनीच ओळखली 'ती' गोष्ट, म्हणाले, "आधी एजे-लीलाचं लग्न नंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.