Tula Shikvin Changalach Dhada Fame Shivani Rangole And Kavita Medhekar : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील अक्षरा व अधिपती या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. इतकंच नव्हे तर या मालिकेतील इतरही पात्रे घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. विशेष म्हणजे मालिकेत अक्षरा व भुवनेश्वरी यांच्यातील वाद पाहणं रंजक ठरतंय. मालिकेतील सासू-सूनेची जुगलबंदी विशेष भावतेय. मालिकेत त्यांच्यात दाखवण्यात आलेले वाद साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. चारुलताच्या रुपातील भुवनेश्वरीने सूनेविरोधात मोठा कट रचलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मालिकेत सासू-सूनांमधील हा वाद पाहायला मिळत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र या दोन्ही कलाकारांचं खास बॉण्ड असलेलं पाहायला मिळतं. भुवनेश्वरी हे पात्र अभिनेत्री कविता मेढेकर साकारत असून अक्षरा हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. शिवानी व भुवनेश्वरी यांचं ऑनस्क्रीन नात्यात अनेक खटके उडत असले तरी त्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग खूपच चांगलं आहे. ऑफस्क्रीन या दोघींमध्ये खूप छान मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी कविता मेढेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवानीने खास पोस्ट शेअर करत तिच्या लाडक्या ताईंना शुभेच्छा दिल्या होत्या.
आणखी वाचा – “फालतूपणा दाखवू नका”, ‘तुला शिकवीन…’वर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “कथाच बदला आणि…”
आता या ऑनस्क्रीन सासू-सूना आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. कारण शिवानीने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने या पोस्टद्वारे तिला मिळालेल्या खास भेटवस्तूचा खुलासा केला आहे. शिवानीला ही खास भेटवस्तू तिच्या लाडक्या सहकलाकार व मैत्रीण कविता यांनी गिफ्ट केली आहे. शिवानीसाठी कविता यांनी लाइट लेव्हेंडर रंगाचा ड्रेस गिफ्ट केला आहे. अभिनेत्रीने हा ड्रेस परिधान करत त्यांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा – Video : “समृद्धी घर रिकामं होतंय”, ‘आई कुठे…’चा सेट रिकामा होताना पाहून कलाकार भावुक, व्हिडीओ व्हायरल
“हा रंग मला सूर्यास्ताची आठवण करून देतो. पुस्तकांच्या वाचनासाठी घालवलेला आरामदायी वेळ, संथ सकाळ आणि आरामदायी अशा सर्व गोष्टींची चाहूल या छानशा रंगामुळे येते. या इतक्या सुंदर ड्रेससाठी खूप खूप थँक्यू कविता ताई!”, असं कॅप्शन देत तिने आभार मानले आहेत. या फोटोंवर कमेंट करत कविता मेढेकरांनी “थँक्यू Pretty गर्ल” असं म्हटलं आहे.