सकाळपासूनच मुंबईत पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रवाशांची, सामान्य नागरिकांची हाल होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलं आहे. परिणामी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलंल चित्र समोर आलं आहे. काही भागांमध्ये तर रस्तेच्या रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आता अशा परिस्थितीत काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईची लोकल सेवा तर पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. पावसाचा फटका मेट्रोलाही बसला आहे. याचंच एक भयावह दृश्य व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. वरळीतील भुयारी मेट्रोची दयनीय अवस्था झाली आहे. (Mumbai Metro 3 underwater due to rain)
रस्ते व रेल्वे जलमय झाल्यानंतर प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मे महिन्यातच राज्यात मान्सून दाखल झाला. त्यामुळे सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. अशा परिस्थितीत प्रशासनाचा भोंगळ कारभारही उघड झाला आहे. रस्ते व लोकल सेवेची बोंब ही यापूर्वीच पावसाच्या दिवसांमध्ये सुरुच होती. आता मुंबई मेट्रोचीही तिच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबई मेट्रो ३ सुरु केली. ही Aqua लाईन मेट्रो सुरु करताना मोठा कार्यक्रमही घेण्यात आला.
आणखी वाचा – Video : केईएम रुग्णालयातही शिरलं पावसाचं पाणी, रुग्णांची वाईट अवस्था, परिस्थिती कठीण तरीही…
पाहा भयावह व्हिडीओ
The newly thrown open Mumbai Metro 3! The much hyped underground Metro. The underground station platform is flooded, water can be seen leaking from the roof, water is flowing through the stairs. The Acharya Atre station has been closed, traffic suspended!
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 26, 2025
Does the Mahabrashth… pic.twitter.com/Tx7lowHaNT
मुंबई मेट्रो ३च्या उद्घाटनाला मोठ्या संख्येने राजकीय मंडळीही होती. आज त्याच मेट्रोची पहिल्या पावसात भयावह अवस्था झाली आहे. भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे वरळी स्थानकात पाणी साचलं. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. नवीन मेट्रो असताना असा प्रकार घडणं खरंच धक्कादायक आहे. पावसाचे पाणी वरळी मेट्रो स्थानकात शिरले. प्रवाशी स्थानकाच्या भुयारी मार्गात उतरताच पाण्याचं तळं साचलं होतं. ही घटना काळजात धडकी भरवणारी होती.
फक्त पाणीच शिरलं नव्हतं तर मेट्रो स्थानकातील काही उपकरणं खाली पडले होते. चेकिंग मशिनची अवस्थाही वाईट झाली आहे. वायरिंगचं सामानही पाण्यात वाहत होतं. इलेक्ट्रीक जीने व इतर उपकरणांचंही यामध्ये नुकसान झालं आहे. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर मेट्रो प्रशासनाने काही बाबी समोर आणल्या. आचार्य अत्रे वरळी स्थानकाजवळील एक भिंत कोसळली. त्यामुळे मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच स्थानकात ज्या भागात पाणी शिरलं तिथलं काम अजूनही पूर्ण न झाल्याचं सांगण्यात आलं आहे.