रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “जावंच लागेल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mukesh Ambani Invited To Shreyas Raje

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, "जावंच लागेल..."

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची तारीख आता जवळ आली आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत व राधिका याचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली असून हळद, संगीत सोहळा अगदी थाटामाटात पार पडलेला पाहायला मिळाला. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटीही हजेरी लावत आहेत. तसेच जवळचे नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडले. (Mukesh Ambani Invited To Shreyas Raje)

मुकेश अंबानी यांच्या सगळ्यात धाकट्या मुलाचं आणि त्यांच्या मुलांपैकी शेवटचं लग्न असल्याने हे लग्न सगळेचजण एन्जॉय करत आहेत. त्यांच्या कुटुंबात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण या सोहळ्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबाकडून सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींना तसेच दिग्गज व्यक्तींनाही लग्नासाठी आमंत्रित कऱण्यात आले आहे. अशातच अनंत अंबानीच्या लग्नाचे आमंत्रण एका मराठमोळ्या अभिनेत्यालाही मिळाले आहे.

आणखी वाचा – नवऱ्याने ज्याच्या कानाखाली मारली त्याच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका मलिक, अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तुझे डोळे…”

या मराठमोळ्या अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती शेअर केली आहे. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस राजे. श्रेयसने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अशातच श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या अंबानी यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर करत त्याने, “आता जावं लागेल लग्नाला”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ना हिरे, ना सोन्याचे दागिने; अंबानींच्या सूनेने हळदीसाठी केला फुलांचा पेहराव, साधेपणाने वेधलं लक्ष

सध्या श्रेयस रंगभूमी गाजवत आहे. चारचौघी या नाटकातून तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. श्रेयसने मुकेश अंबानी यांच्या मुलाची लग्नपत्रिका शेअर करत ही पत्रिका त्याच्यापर्यंत कशी पोहोचली हे देखील सांगितलं आहे. यावेळी त्याने लिहिलं की, “तर ही दस्तुरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक माणूस अँपॉईंट केला होता. जो वांद्रे येथून घोडबंदरपर्यंत फक्त पत्रिका द्यायला आला होता. कौतुकास्पद व्यवस्थापन आहे”.

Tags: anant ambani weddingmarathi actorMukesh Ambani Invited To Shreyas Rajeshreyas raje
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Tripti Dimri Troll

Video : विकी कौशलबरोबरच्या गाण्यात तृप्ती डिमरीचे अधिक हॉट सीन, प्रेक्षकांनी राखी सावंत, मल्लिका शेरावतबरोबर केली तुलना, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.