शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सासरी गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झाली मुग्धा वैशंपायन, गायिकेच्या संस्कारांचं कौतुक, म्हणाले, “इतका साधेपणा…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan shared a video of her singing on the occasion completing six months of marriage

Video : सासरी गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झाली मुग्धा वैशंपायन, गायिकेच्या संस्कारांचं कौतुक, म्हणाले, "इतका साधेपणा..."

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्न सोहळ्यामुळे विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर ही जोडी अनेक प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. आपल्या गाण्याने चर्चेत राहणारी ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते. अशातच त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.   

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

२१ डिसेंबर रोजी मुग्धा-प्रथमेश ही जोडी विवाहबंधनात अडकली. अशातच नुकतेच त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले असून या सहा महिन्यांच्या पूर्ततेनिमित्त मुग्धाने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आरवलीत श्री आदित्यनारायणाचं देऊळ आहे. गेली सुमारे १४७ वर्ष आदित्यनारायणाचा उत्सव सुरू आहे. उत्सवाचं माझं हे पहिलंच वर्ष”.

आणखी वाचा – “मी साफ नकारच दिला होता पण…”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, “परिक्षकाचा मान…”

यापुढे तिने “जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ शेअर करत आहे” असं म्हणत “तुम्हा सर्वांना जागतिक योग आणि संगीत दिनाच्या निरोगी आणि सुरेल शुभेच्छा” असं म्हटलं. तसेच यापुढे तिने “आम्हाला ६ महिन्यांच्या शुभेच्छा” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – “मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…”, जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, “काळी आली असं बोलले…”

दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी “किती गोड, क्या बात है, खूपच सुंदर, खरंच अत्यंत सुरेख गायन मुग्धा, छान परंपरा जपत आहात, सुंदर” अशा अनेक कमेंट्स करत या प्रतिसाद दिला आहे.

Tags: marathi entertainment newsmarathi singermugdha vaishampayan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Sana Makbul Khan accident

"कुत्र्याने ओठाला चावलं अन्…", 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "शस्त्रक्रिया करावी लागली आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.