शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पूजेला आलेल्या भटजीसारखा…”, व्याहीभोजनाचा फोटो शेअर केल्यानंतर प्रथमेश लघाटे ट्रोल, संताप व्यक्त करत म्हणाला, “पारंपरिक गोष्टीत रोमान्स…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha vaishampayan and prathamesh laghate

"पूजेला आलेल्या भटजीसारखा…", व्याहीभोजनाचा फोटो शेअर केल्यानंतर प्रथमेश लघाटे ट्रोल, संताप व्यक्त करत म्हणाला, "पारंपरिक गोष्टीत रोमान्स…"

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत या जोडीने त्यांच्या नात्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हापासून मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळाले. (Mugdha vaishampayan and prathamesh laghate)

काही दिवसांपूर्वीच मुग्धाची ‘ब्राईड टू बी’ पार्टी तिच्या मित्र मंडळींनी केली. मुग्धाच्या ‘ब्राईड टू बी’ पार्टीचे अनेक फोटोस सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच या जोडीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी एकत्र फोटो शेअर करत त्याखाली व्याहीभोजन असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “तुझा पहिलाच चित्रपट अन्…” लेकासाठी प्रसाद खांडेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझं इंग्रजी ऐकताना…”

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

या पोस्टमध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. या फोटोवरून नेटकऱ्यांनी प्रथमेशला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. मात्र प्रथमेशनेही नेटकऱ्याला उत्तर देत चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्याने त्यांचा पारंपरिक लूक व पोज पाहता, “मस्त जोडी आहे फक्त प्रथमेशला बोल रोमँटिक असल्यासारखं दिस. सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खुप छान” अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत, “अण्णा. व्याहीभोजन ही आपली परंपरा आहे. पारंपरिक गोष्टीत कुठं रोमान्स घुसडवता राव? एवढा गोंधळ?” असं उत्तर देत चांगलंच सुनावलं आहे.

आणखी वाचा – Video : “देवांनी सांगावा धाडला अन्…”, जेजुरी गडावर पोहोचली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “देवाने अजून…”

लवकरच मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुलच अगदी साध्या पद्धतीने विवाहसोहळा उरकला. यावेळी ही मुग्धा-प्रथमेशचा पारंपरिक लूक लक्षवेधी होता.

Tags: celebrity coupleentertainmentmugdha prathameshmugdha vaishampayanprathamesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
marathi and bollywood actor sachin khedekar celebrating 30th marriage anniversary with wife jalpa khedekar photo viral on social media

लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, "माझ्या आयुष्यातील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.