आपल्या गायन शैलीने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायक-गायिकेची जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा व प्रथमेश या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी अनेक कारणांनी चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
अशातच त्यांनी नुकतंच त्यांच्या पहिल्या गुढीपाडव्यानिमित्ताचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. यंदाचा गुढीपाडवा हा मुग्धा व प्रथमेश यांच्यासाठी खुपच खास होता. कारण त्यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा होता आणि हा पाडवा मुग्धाने तिच्या माहेरी म्हणजेच अलिबागमध्ये साजरा केला. त्यांनी त्यांचा हा पहिला गुढीपाडवा आनंदात व उत्साहात साजरा केला.

यावेळी मुग्धा व प्रथमेशसह मुग्धाची मोठी बहीण मृदुल ही गुढीपाडवा साजरा करायला आली तिच्या माहेर आली होती आणि दोघींच्या या पहिल्या पाडव्याचे खास फोटो मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. “लग्नानंतरचा यांचा पहिला गुढीपाडवा” असं म्हणत तिने हे खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मुग्धा-प्रथमेशसह मुग्धाची बहीण मृदुल व तिचा नवरादेखील पहायला मिळत आहे. तसेच मुग्धाचे पूर्ण कुटुंबही या फोटोमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज सौभाग्य योगाचा शुभ संयोग, ‘या’ पाच राशींसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी, जाणून घ्या…
मुग्धा-प्रथमेश यांचा हा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा होता. त्यामुळे त्यांच्यासाठी यंदाचा हा गुढीपाडवा अगदी खास होता. गुढीपाडव्याच्या दिवशी त्यानी त्यांच्या पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच त्यांच्या या नवीन फोटोनीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून प्रथमेशने आकर्षक डिझाईन असलेला शर्ट परिधान केला आहे.