बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घराचं भाडं देण्यासाठीही…”, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला भोगावा लागला त्रास, म्हणाला, “माझे जेवण कुत्र्यांना द्यायचो आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arjun rampal on struggling days

“घराचं भाडं देण्यासाठीही...”, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला भोगावा लागला त्रास, म्हणाला, “माझे जेवण कुत्र्यांना द्यायचो आणि...”

अर्जुन रामपाल हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. २००१ साली त्याने ‘मोक्ष’ या चित्रपटातून अभिनय करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जगा निर्माण केली. मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या अर्जुनचे कुटुंब हे सैन्यातील होते. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर तो त्याच्या आईबरोबर राहू लागला. त्याने अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर पुढे त्याने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मॉडेलिंग सोडून त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा मॉडेलिंगपासून ते अभिनयापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. त्याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे. (arjun rampal on struggling days )

नुकताच त्याने ‘पॉप डायरीज’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला त्याच्या वाईट प्रसंगाबद्दल विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले की, “आपण आपल्या संघर्षाचे दिवस लक्षात ठेवत नाही. जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा तुम्ही ते सर्व विसरू इच्छिता. पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्ही घाबरत असता”.

आणखी वाचा – रोहिणी हट्टंगडींना विमानप्रवासादरम्यान मिळाल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, खास सरप्राइज मिळताच हात जोडून नमस्कार केला अन्…

View this post on Instagram

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

पुढे त्याने सांगितले की, “तो एक यशस्वी मॉडेल होता. अशोक मेहता माझ्याकडे ‘मोक्ष’ हा चित्रपट घेऊन आले होते. यामध्ये माझ्याबरोबर अभिनेत्री मनीषा कोइरालादेखील होती. त्यावेळी माझे करियरदेखील चांगले सुरु होते. मी मनीषाबरोबर चंबळच्या खोऱ्यात शूट करत होतो. तेव्हा अचानक एक गर्दी माझ्या समोर आली आणि मला स्वतःबद्दल तिरस्कार होऊ लागला. तेव्हा मी विचार केला आणि म्हणालो हे देवा, हे सर्व भयंकर आहे. मी आता यापुढे मॉडेलिंग करणार नाही असा विचार केला. हा चित्रपट बनवण्यासाठी सहा वर्ष लागतील असा विचारदेखील मी केला नव्हता”.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनच्या माहेरी दणक्यात साजरा झाला लग्नानंतरचा पहिला सण, जावई बापूंचाही खास पाहुणचार, म्हणाले, “लग्नानंतर…”

पुढे त्याने मॉडेलिंगच्या दिवसाबद्दल सांगितले की, “मी तेव्हा अंधेरी येथे राहायचो. तेव्हा माझा वाईट काळ सुरु होता आणि माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा माझे घरमालक सरदार होते त्यांनी माझी खूप मदत केली. ते दर महिन्याच्या पहिल्या तारखेला यायचे आणि विचारायचे  की ‘नाही आहेत?’ म्हणजे पैसे नाहीत का? तेव्हा मी मान हलवून नाही म्हणायचो. त्यावर तू तर देशीलच असे म्हणून निघून जायचे. ते खूप चांगले होते. तुम्हाला आयुष्यात असे प्रसंग येणे गरजेचे असते”.

तसेच त्याने सांगितले की, “मी नंतर घर बदलले. सरदारजींचे घर मला परवडत नव्हते. माझ्याकडे तेव्हा दोन कुत्रे होते. मी स्वतः शाकाहारी खायचो आणि कुत्र्यांना मांसाहारी जेवण द्यायचो. माझ्याबरोबरच असे का घडत आहे असा विचार मी करायचो पण असे होणे गरजेचे असते”.

त्याने ‘दिल है तुम्हारा’, ‘दिल का रिश्ता’, ‘रावण’, ‘हिरोईन’, ‘ओम शांती ओम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

Tags: arjun rampalmodel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Sayaji Shinde recently underwent a heart surgery know about the actor's health

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, "हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.