प्रिया-उमेश, सिद्धार्थ-मिताली,रितेश- जिनेलिया अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आहेत. या यादीत आता शिवानी आणि विराजस या जोडीचं नाव देखील घेतलं जात.माझा होशीलना या मालिकेतून विराजस घरोघरी पोहोचला. तर शिवानीने अनेक मालिकांमधून आपल्या कामाची छाप पाडली आहे.सध्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी मुख्य नायिका आहे.(Mrinal Kulkarni virajas shivani)
विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्यामुळे विराजस आणि शिवानी व्यतिरिक्त ही माय- लेकाची आणि सासू-सुनेची जोडी देखील चांगलीच चर्चेत असते. अनेकदा रेड कार्पेटवर मृणाल आणि शिवानीच बॉण्डिंग पहायला मिळत.एव्हरग्रीन अभिनेत्रींनमध्ये मृणाल कुलकर्णी यांचं नाव आवर्जून घेतलं जात. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात. चित्रपट, मालिका, नाटक या सगळ्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं आजवर भरभरून मनोरंजन केलं आहे. सोनपरी म्हणून त्यांची ओळख प्रेक्षकांच्या मनात कायम राहील.
पहा काय आहे मृणाल कुलकर्णीची पोस्ट ? (Mrinal Kulkarni)
हे सगळेच कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून कुटुंबाचे फोटोज शेअर करत असतात.असाच मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून विराजस आणि शिवानीच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.गेल्या वर्षी अक्षय तृतीया या मुहूर्तावर विराजस-शिवानीचं लग्न झालं होत. त्या पोस्टला प्रिय शिवानी आणि विराजस, आज अक्षय तृतीया. तिथीनुसार आज तुमचा लग्नाचा पहिला वाढदिवस,एक वर्ष झालं,हे वर्ष इतकं झटकन गेलं कि आपल्याला सर्वाना असं वाट्टेल किती वर्ष गेली आहेत.स्वप्न आणि मेहनतीमुळे हे सर्व शक्य झालं.आनंदी रहा. तुम्हाला खूप प्रेम.असे, कॅप्शन देऊन त्यांनी विराजस आणि शिवानीला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Mrinal Kulkarni virajas shivani)

हे देखील वाचा : ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
लग्नाआधी शिवानी आणि विराजस एका नाट्यसंस्थेमध्ये अनेक वर्ष एकत्र काम करत होते.त्यामुळे खूप आधी पासूनच ते एकमेकांचे खूप छान मित्र होते. त्यामुळे त्यांची ही मैत्री त्याचं नातं खूप घट्ट करताना दिसतेय.तसेच त्यांच्या प्रत्येक निर्णयात मृणाल त्यांना कायम साथ देताना दिसतात. विराजस आणि शिवणीने रफूचक्कर नावाचं ब्रँड देखील सुरु आहे.याचसोबत विराजसने व्हिक्टोरिया चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येत असतात. आणि त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.
