महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही.लेखक,दिग्दर्शक आणि कलाकार या सर्वानीच या शोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.उत्तम लेखन, विनोदाचं अचूक टायमिंग ही नक्कीच या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. हास्यजत्रतने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून दिलं. (vanita kharat troll)
अशीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मनोरंजनच कम्प्लिट पॅकेज असणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. या शो निमित्त वनिताला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवून दिलं आहे.कबीर सिंग चित्रपटातील तिच्या भूमिकेला तर तुफान प्रतिसाद मिळाला. वनिताने तिच्या कामाने स्वतःच एक अस्तित्त्व निर्माण केलं.वनिता तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते.
पाहा का होते आहे वनिता ट्रोल? (vanita kharat troll)
काही महिन्यांपूर्वी वनिता विवाहबंधनात अडकली तेव्हापासून तिच्या नवऱ्यासोबतचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतात. सध्या हास्यजत्रेचे परदेशात दौरे सुरु आहेत. आता हास्यजत्रेची टीम अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. तिकडे देखील त्यांच्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.तिकडचे अनेक फोटोज व्हीडोइज देखील कलाकार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करत आहेत त्यांना देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
वनिताने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.त्या पोस्टवर, हिचा जेवढा हात आहे तेवढी माझी मांडी नाही, एवढी छान कलाकार आहेस आणि फोटो असे अपलोड करतेस अशा अनेक कमेंट करून तिला ट्रोल केले आहे.वनिता तुला स्वतःला चांगलं वाटतंय का बघ? यांसारख्या अनेक कमेंट्स पाहायला मिळतात. पंरतु ट्रोल करणाऱ्यांसोबतच बॉडी शेमिंगच्या विरोधात आणि वनिताच्या बाजूने बोलणारे देखील काही चाहते आहेत ज्यांनी हे आपलेच लोक असतात जे आपल्याला पाय पकडून खाली पाडत असतात.जेवढ तिच्या कडे टॅलेंट आहे ना त्यातलं थोडं तरी तुझ्या कडे आहे का शोध असं म्हणत वनिताला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.(vanita kharat troll)
हे देखील वाचा : “मला बाई फार आवडला नाही”- ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल विजू मानेंची पोस्ट चर्चेत