बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ वेबसीरिजला मानाचा पुरस्कार, प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 27, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'इट्स मज्जा'च्या 'आठवी-अ' वेबसीरिजला मानाचा पुरस्कार, प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव

'इट्स मज्जा'च्या 'आठवी-अ' वेबसीरिजला मानाचा पुरस्कार, प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव

Radio City Mumbai Icon Award 2025 : मराठी चित्रपटसृष्टी, मालिकाविश्व, वेबविश्वातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. बुधवार (२७ मार्च) विलेपार्ले पूर्व येथील सहारा स्टार येथे सायंकाळी हा सोहळा थाटामाटात पार पडला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, आणि तंत्रज्ञ मंडळींच्या साक्षीने कलाकारांच्या कर्तृत्वाचा सन्मान या मंचावर झाला. यावेळी मराठी वेबविश्वातील एका लोकप्रिय वेबसीरिजला मिळालेल्या पुरस्काराने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ आणि ‘इट्स मज्जा’ प्रस्तुत ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने यंदाच्या ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’ मध्ये हवा केली असल्याचं पाहायला मिळालं.

डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आहे. आपण ‘आठवी अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सीरिजमधून देण्यात आली आहे. ‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे.

आणखी वाचा – कुणाल कामरा काही केल्या थांबेना; निर्मला सीतारमण यांना गाण्यामधून डिवचलं, म्हणाला, “लोगों को लूटने कमाई साडीवाली दीदी…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आठवी-अ सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. लाखों व्ह्यूज्सचा टप्पा या सीरिजने पार केला आहे. त्यामुळे ‘आठवी-अ’ला मिळत असलेल्या या भरघोस यशाची ‘रेडिओ सिटी’नेही दखल घेत कौतुक केले. काल या सीरिजचं ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’च्या मंचावर भरभरुन कौतुक झाले आणि ‘प्रादेशिक वेबसीरिज – आठवी अ (इट्स मज्जा)’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आठवी-अ’च्या संपूर्ण टीमचे हे यश आहे.

आणखी वाचा – Video : कार्तिकी गायकवाडच्या भावाच्या केळवणाचा न्याराच थाट, सासरी बोलावून जंगी स्वागत, फुलांच्या पायघड्या अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह-दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण यांनी सीरिजची प्रोजेक्ट प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे आणि फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी सांभाळला आहे.

Tags: Aathvi amarathi webseriesRadio City Mumbai Icon Award 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
April May 99 Movie Starcast

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात झळकणार ‘हे’ चेहरे, बालपणीच्या आठवणींना मिळणार उजाळा, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.