सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे काल हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक कलाकार भावुक झालेलेदेखील दिसून आले. झाकीर यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. झाकीर यांचे मनोरंजन क्षेत्रात खूप मोठे स्थान होते. त्यांनी भारतीय संगीताला संपूर्ण जगभरात स्थान दिले होते. त्यांच्या तबलावादनाने भारतीय सांगितला मोठी प्रेरणादेखील मिळाली आहे. अशातच आता झाकीर यांच्यावर अंतिम संस्कार कधी व कुठे होणार आहेत? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (zakir hussain cremation)
दरम्यान ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. तबला वादक झाकीर यांच्यावर सॅन फ्रान्सिस्को येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच बुधवारी तिथेच त्यांना दफन करण्यात येणार आहे. झाकीर यांचे भाऊ फजल कुरेशी भारतातून अमेरिकेत रवाना झाले आहेत. तसेच बहीण औलियादेखील लंडनमधून अमेरिकेसाठी रवाना झाली आहे. तसेच सुत्रांनुसार, झाकीर यांची इटालियन पत्नी एंटोनिआ मिन्नेकोला यांना सांगितले होते की नेहमी त्यांच्याबरोबर राहायचे आहे.
निधनानंतरही झाकीर यांना तिच्या आसपास राहायचे आसपास राहायचे आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेमध्येच कुठेतरी दफन करण्यात यावे अशी इच्छा झाकीर यांनी व्यक्त केली होती. दरम्यान झाकीर हुसैन यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी एका अद्भुत क्षणाचा उल्लेख केला आहे. झाकीर हुसैन यांनी २९ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ परदेशातील आहे. ते फिरायला गेले होते. त्यांनी शेरा केलेल्या व्हिडीओमध्ये वातावरण खूप आल्हाददायक झालेलं दिसत आहे. वारेही वाहू लागल्याने झाडांवर लाल पिवळी पाने फडफडताना दिसत आहेत. त्यांनी हा क्षण शेअर करत ‘सुंदर आणि अद्भुत’ असं म्हटलं.
झाकीर यांनी मॅनेजर अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. शशी कपूर यांच्याबरोबरही काम केले, पण त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात.