‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी घराघरात पोहोचली. दोघांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात प्रथमेश व मुग्धाच्या गाण्याचे चाहते असलेले पाहायला मिळतात. ‘आमचं ठरलं’ म्हणत दोघांनी प्रेमाची कबुली देत काही दिवसांनी लग्न सोहळा उरकला. लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाह सोहळा झालेला पाहायला मिळाला. लग्नानंतर ही जोडी बरेच चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate)
सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही चाहत्यांसह शेअर करत त्यांना अपडेट देत असतात. अशातच मुग्धाने आता शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मुग्धाला प्रथमेशने खास सरप्राईज दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नानंतरच्या वाढदिवसाला प्रथमेशने दिलेले हे खास सरप्राईज मुग्धाने शेअर केलं आहे. “लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला”, असं कॅप्शन देत मुग्धाने प्रथमेशने दिलेल्या सरप्राइजचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुग्धा व प्रथमेश सध्या कर्नाटक येथे फिरायला गेले आहेत आणि तेथे फिरतानाचा हा एक छोटासा व्हिडीओ तिने शेअर केलेला पाहायला मिळत आहे. या वेळेला ते कर्नाटक येथील जंगल सफारीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच ते बोटिंगचाही आनंद घेताना दिसत आहेत. पहिल्यांदाच बोटिंग केलं असल्याचे यावेळी मुग्धाने म्हटलं. तसेच पहिल्यांदाच ती जंगल सफारी करणार असल्याचाही आनंद तिने यावेळी व्यक्त केला. शिवाय तेथील काही ऍक्टिव्हिटीजही ते करताना दिसतात. लग्नानंतरच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशने मुग्धाला दिलेलं हे खास सरप्राइज तिला आवडलं असून तिने व्हिडीओमध्ये प्रथमेशचे आभारही मानले आहेत.
लग्नानंतर प्रथमेश व मुग्धा दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. आणि ते आनंदात असल्याचेही पाहायला मिळाले. प्रथमेश व मुग्धा हे बरेचदा कोकणदौरा करत असतात. प्रथमेश हा मूळचा कोकणातील असल्याने ते गावी जात असतात. तर मुग्धा ही अलिबागची असल्याने ते अलिबाग, कोकण असा प्रवास करत असतात.